Transfer News : पोलिस दलात मोठा फेरबदल; १४४ पीपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Uttar Pradesh Transfer News : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. शासनाने एकाच वेळी १४४ PPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहे.
UP Police Transfer News
UP Police Transfer News AI Image
Published On: 

उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यात आधी आयएएस आणि पीसीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता पोलिस विभागातही मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. शासनाने एकाच वेळी १४४ PPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील पोलिस प्रशासनात मोठी उलथापालथ झाली आहे.

या बदल्यांमध्ये अनेक जिल्ह्यांतील पोलीस उपअधीक्षक (DSP) आणि इतर महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, काही अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, शोभित कुमार यांची कानपूर देहात येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिलीप कुमार सिंह यांना मिर्झापूर, तर सुजीत कुमार दुबे यांना अयोध्या येथे जबाबदारी देण्यात आली आहे. शुभम तोडी यांची संभल येथे, अतुल कुमार सिंह यांची महाराजगंज येथे आणि महेंद्र कुमार शुक्ला यांची महोबा येथे बदली करण्यात आली आहे.

UP Police Transfer News
Transfer News : पोलीस दलात मोठे फेरबदल! तब्बल २७३ DSP आणि एका IPS अधिकाऱ्याची बदली, कुणाची कुठे झाली नियुक्ती

रवि कुमार गुप्ता यांना गोंडा येथे, तर आशुतोष तिवारी आणि राजेश सिंह यांना हरदोई येथे नियुक्त करण्यात आले आहे. नीलेश मिश्रा यांची गोरखपूर, प्रवीण कुमार सिंह यांची हापुड आणि राजेश कुमार सिंह यांची शाहजहांपूर येथे बदली झाली आहे. याशिवाय ओंकार दत्त तिवारी यांना गाझियाबाद पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

UP Police Transfer News
Bank Closed : नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ४ दिवस बँका राहणार बंद, वाचा सुट्ट्यांची यादी

कुलदीप कुमार गुप्ता यांची मुजफ्फरनगर, रजनीश वर्मा यांची बागपत, राजेश कुमार श्रीवास्तव यांची सुलतानपूर आणि अनुज मिश्रा यांची शाहजहांपूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. चमन सिंह चावडा यांना मथुरा येथे पाठवण्यात आले आहे. निवडणुकीपूर्वी झालेल्या या मोठ्या बदल्यांमुळे उत्तर प्रदेशमधील पोलिस प्रशासनात नव्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाच्या या निर्णयानंतर संबंधित अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी पदभार स्वीकारावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.