Crime: बायकोसोबत कडाक्याचं भांडण, राग डोक्यात गेला; नवऱ्याने गळा दाबून जागीच संपवलं

Dombivli Crime: डोंबिवलीमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. एका व्यक्तीने किरकोळ वादातून बायकोची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने घरातून पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
Crime: बायकोसोबत कडाक्याचं भांडण, राग डोक्यात गेला; नवऱ्याने गळा दाबून जागीच संपवलं
Dombivli CrimeSaam Tv
Published On

Summary -

  • किरकोळ वादातून एका व्यक्तीने बायकोची हत्या केली

  • डोंबिवलीच्या कोळेगाव परिसरात ही घटना घडली

  • नवऱ्याने बायकोची गळा आवळून हत्या केली

  • आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली

डोंबिववीमध्ये एका तरुणीची हत्या करत तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून खाडीत फेकून देण्यात आल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच डोंबिवलीमध्ये आणखी एक हत्याकांडाची भयंकर घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून नवऱ्याने बायकोची हत्या केली. हत्येनंतर आरोपी फरार झाला. ही घटना डोंबिवली कोळेगाव परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील कोळेगाव परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. किरकोळ वादातून नवऱ्याने बायकोची गळा आवळून हत्या केली. ज्योती धाहीजे असे मृत महिलेचे नाव होते. तर पोपट धाहीजे असं आरोपीचे नाव आहे. बायकोची हत्या करून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना मंगळवारी रात्री उडली. आज सकाळी ही घटना उघकीस आली.

Crime: बायकोसोबत कडाक्याचं भांडण, राग डोक्यात गेला; नवऱ्याने गळा दाबून जागीच संपवलं
Kolhapur Crime: सासऱ्याला लढायची होती निवडणूक, १० लाख रुपयांसाठी सुनेकडे तगादा; छळाला कंटाळून आयुष्य संपवलं

मंगळवारी रात्री ज्योती आणि त्यांच्या नवऱ्याचा किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद इतका चिघळला की पोपट धाहीजेने रागाच्या भरात बायकोचा गळा आवळून हत्या केली. घटनेनंतर घरातून पळ काढत आरोपी पसार झाला. मानपाडा पोलिसांनी पोपट धाहीजे याच्या शोधासाठी तपासाचे चक्र फिरवले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संभाव्य ठिकाणे आणि परिचित लोकांकडून माहिती घेत पोलिस पथक आरोपीचा शोध घेत आहे. या घटनेमुळे डोंबिवलीच्या कोळेगाव परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास मानपाडा पोलिसांकडून सुरू आहे.

Crime: बायकोसोबत कडाक्याचं भांडण, राग डोक्यात गेला; नवऱ्याने गळा दाबून जागीच संपवलं
Mumbai Crime: मुंबई हादरली! बर्थडे सेलिब्रेशनवेळी ५ मित्रांनी तरुणाला पेट्रोल टाकून पेटवलं, थरकाप उडवणारा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com