Thane-Dombivli: डोंबिवली-ठाणे प्रवास ३५ मिनिटांनी होणार कमी; या ठिकाणी बांधणार चारपदरी उड्डाणपूल, मेगाप्लान ठरला

Thane-Dombivli 4 Lan Overbridge Approved: ठाणे आणि डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता ठाणे ते डोंबिवली प्रवास फक्त २५ मिनिटांत होणार आहे. प्रवाशांची तब्बल ३५ मिनिटे वाचणार आहेत.
Thane-Dombivli
Thane-DombivliSaam Tv
Published On
Summary

ठाणे आणि डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी

मोठागाव रेल्वे फाटकावरुन ४ पदरी उड्डाणपूल बांधणार

प्रवासाचा वेळ ३५ मिनिटांनी कमी होणार

कल्याण डोंबिवली फक्त २५ मिनिटांत गाठता येणार

प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका

डोंबिवली आणि ठाणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता डोंबिवली ते ठाणे प्रवास सुसाट होणार आहे.आता डोंबिवलीतील माणकोली उड्डाणपुलाशी संलग्न असलेल्या रेतीबंदर मोठागाव रेल्वे फाटकावरील चार पदरी रेल्वे उड्डाणपूल बांधण्यास मंजुरी मिळाली आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकल्पाना मंजुरी दिली आहे. यामुळे मुंबई आणि ठाण्यालगतची वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

Thane-Dombivli
Vande Bharat Express : नांदेडमधून आणखी एक वंदे भारत, पुण्याला फक्त ७ तासात; कुठे कुठे थांबणार, तिकिट किती? वाचा A टू Z माहिती

२५ मिनिटांत ठाणे ते डोंबिवली (Thane-Dombivli in Just 25 Minutes)

ठाण्याहून डोंबिवलीला जाताना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. कधी कधी तर तासनतासन एकाच जागेवर थांबावे लागते. दरम्यान, आता या उड्डाणपुलामुळे हा प्रवास जलद होणार आहे. यामुळे ठाणे-डोंबिवली प्रवास अवघ्या २५ मिनिटांत होणार आहे. प्रवाशांची ३५ मिनिटे वाचणार आहेत.

सध्या ठाणे ते डोंबिवली प्रवासाला सध्या १ तास लागतो. आता या मोठागाव फाटकावरील उड्डाणपुलामुळे प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. या उड्डाणपुलाच्या कामासाठी १६८ कोटीचा निधी प्रस्तावित केला आहे.

मोठागाव येथील रेल्वे फाटक हे अनेक वर्षांपासून अडथळा ठरत आहे. डोंबिवलीवरुन माणकोली उड्डाणपुलामार्गे ठाण्याच्या दिशेने जाताना प्रवाशांना वाहतूक कोंडीत थांबून राहावे लागते. त्यामुळे त्यांना विलंब होतो. आता थेट मोठागाव रेल्वे फाटकावरुनच चार पदरी उड्डाणपूल बांधला जाणार आहे.

खर्च किती येणार?

MMRDA ने दिलेल्या आराखड्यानुसार, १६८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामधील ३० कोटी जमीन संपादनासाठी तर उर्वरित १३८ कोची बांधकामासाठी वापरले जाणार आहे. यामुळे ६०० रहिवाशांना पुनर्वसित करावे लागणार आहे.

Thane-Dombivli
Vande Bharat Train: रेल्वेचा कोच की हॉटेलचा रुम! वंदे भारत स्लीपर ट्रेनमधील व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

चाद पदरी उड्डाणपूल बांधणार (4 Lane Overbrigde Approved)

सुरुवातीला या पूलाचा आराखडा हा दोन लेनचा होता. त्यानंतर नागरिकांच्या मागणीनंतर ४ पदरी उड्डाणपूल तयार करण्याचा निर्णय घेतला. यामुळे भविष्यात वाहतूक कोंडी दूर होणार आहे. याचसोबत प्रवाशांचा वेळदेखील वाचणार आहे. हा प्रवास जवळपास ३५ मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा आहे

Thane-Dombivli
Thane To Amravati: ठाणेहून अमरावतीला कसे पोहोचाल? 'या' मार्गांचा वापर करून करा आरामदायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com