Kolhapur Crime: सासऱ्याला लढायची होती निवडणूक, १० लाख रुपयांसाठी सुनेकडे तगादा; छळाला कंटाळून आयुष्य संपवलं

Married Woman Ends Life: स्थानिक निवडणूक लढवण्यासाठी पैसे हवे म्हणून एका विवाहितेचा छळ झालाय. माहेराहून १० लाख रुपये आण, अशी मागणी पती आणि सासरची मंडळी करत होते. पैशांसाठी ते विवाहितेचा छळ करत होते. या छळला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडलीय.
Married Woman Ends Life:
Kausar Gargare from Kurundwad ended her life after alleged harassment for ₹10 lakh demanded for election expenses.saam tv
Published On
Summary
  • विवाहितेवर निवडणुका लढवण्यासाठी पैसे आणण्याचा दबाव

  • पोलिसांनी पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल केलाय.

  • पती आणि सासरच्या मंडळींकडून महिलेचा मानसिक छळ

रणजित माजगावकर, साम प्रतिनिधी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागलंय. नगरपंचायत आणि नगर परिषदेसाठी डिसेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत. आपल्या विजयासाठी उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. मात्र याचदरम्यान एक संतापजनक घटना घडलीय. निवडणुक लढवण्यासाठी पैसे हवे म्हणून एका विवाहितेचा छळ करण्यात आला. सतत होणाऱ्या छळाला कंटाळून महिलेनं आत्महत्या केलीय. ही धक्कादायक घटना कोल्हापुरातील कुरुंगवाद येथे घडलीय.

Married Woman Ends Life:
Shocking : इंजिनीअर तरूण लैंगिक समस्येनं हैराण, जडीबुटीवाल्या बाबाकडं गेला अन् ४८ लाखांना फसला, किडनीही फेल

सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या आर्थिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून विवाहित महिलेनं टोकाचं पाऊल उचललं. कोल्हापुरात जिल्ह्यातील कुरुंदवाड मधील एका विवाहित महिलेचा पैशांसाठी छळ होत होता. निवडणूक खर्चासाठी माहेराहून १० लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी सासरकडील मंडळी करत होते. त्या पैशांसाठी त्यांनी विवाहितेचा छळ सुरू केला होता.

Married Woman Ends Life:
स्पा सेंटरच्या नावाखाली 'गंदी बात', पॉश एरियात वेश्याव्यवसाय; महिलेसह ११ जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

हाती आलेल्या माहितीनुसार, कौसर गरगरे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर पोलिसांनी या घटनेप्रकरणी कौसर यांचा पती, सासू- सासऱ्यासह जावेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कैसर यांचा भाऊ अल्ताफ आवटी यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कौसर यांचा सासरा राजमहंदर गरगरे कुरुंदवाड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून आहे.

त्यामुळे निवडणुकीत खर्च करण्यासाठी माहेराहून १० लाख घेऊन येण्याची मागणी विवाहितेकडे केली जात होती. त्यासाठी, सासरच्या मंडळींकडून कौसर यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्यामुळे, गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कौसर यांनी घराच्या छताला गळफास घेऊन स्वत:चं आयुष्य संपवलं. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com