Liquor Delivery  Google
क्राईम

Crime News: 'बंटी-बबली'ची 'पुष्पा' स्टाईल; हुंड्यात मिळालेल्या गाडीतून करायचे दारुविक्री, अलगद अडकले पोलिसांच्या जाळ्यात

Bride Liquor Delivery With Husband: बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एक जोडपं फिल्मी स्टाईलमध्ये मद्यविक्री करत असल्याचं समोर आलं आहे. आपण या घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

Rohini Gudaghe

Bihar Crime News

बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये पोलिसांनी मद्यविक्रीच्या डिलिव्हरीमध्ये सहभागी असलेल्या एका जोडप्याला अटक केली आहे. मद्यविक्री ( Liquor Delivery) हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे छुप्या पद्धतीने मद्यविक्री केली जाते. पण बिहारमधील एका जोडप्यानं मद्यविक्रीसाठी अनोखी शक्कल लढविली आहे. (Latest Crime News)

हे जोडपं हुंडा म्हणून मिळालेल्या आलिशान कारमध्ये वधू-वरांची वेशभूषा करून फिल्मी स्टाईलमध्ये फोन कॉल्सवर ब्रँडेड मद्य पोहोचवत (Crime News) होतं. मद्य विक्रीसाठी या लोकांनी एक कोड वर्ड तयार केला होता. याद्वारे डिलिव्हरी केली जात होती. सध्या पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फिल्मी स्टाईलमध्ये मद्यविक्री

मिळालेल्या माहितीनुसार, मदनानी गल्लीत मद्य खरेदी-विक्री होत असल्याच्या माहितीवरून मिठणपुरा पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी खरेदीदार असल्याचं भासवून मद्य मागविण्याचे आदेश दिले (Bihar Crime News) होते. यानंतर एक तरुण जोडपं आलिशान कारमधून मद्य पोहोचवण्यासाठी आलं होतं. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यात महागड्या ब्रँडचं विदेशी मद्य आढळून आलं होतं. पोलिसांनी तात्काळ कार ताब्यात घेऊन जोडप्याला अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, मुझफ्फरपूर येथील या जोडप्याने मद्य वितरणासाठी वेगळी पद्धत अवलंबली (Bride Liquor Delivery With Husband) होती. या दोघांची चौकशी केली असता दोघेही नाव व पत्ते बदलत होते. काटेकोरपणे चौकशी केल्यानंतर या दोघांची ओळख रामबाग परिसरातील सनी उर्फ ​​राहुल आणि त्याची पत्नी जया अशी झाली. या दोघांनी पोलिसांना मद्य व्यवसायाशी निगडित इतर अनेकांची नावे आणि पत्ते सांगितले आहेत. या दोघांच्या ठावठिकाणी पोलिस छापे टाकत आहेत.

पोलिसांनी रचला सापळा

वास्तविक, मिठनपुरा पोलिस ठाण्याच्या पोलिसांना एक मुलगी तिच्या पतीसोबत त्यांच्या आलिशान कारमध्ये मद्याची होम डिलिव्हरी करते, अशी माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी सापळा रचून ग्राहकांच्या वेशात कोडवर्डमध्ये मद्य मागवलं (Bihar news) होतं.

मद्य पोहोचवण्यासाठी ही महिला मिठणपुरा येथे पोहोचताच पोलिसांनी या जोडप्यााला अटक केली आहे. कारमधून मद्याचा साठा (Liquor) जप्त करण्यात आली आहे. या लोकांनी दारू विक्रीसाठी 'बच्चा, आधार झारखंड, बंगाल खंभा' असे कोडवर्ड तयार केले होते. मिठणपुरा पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toll Tax : खराब रस्त्यांवर टोल वसुली नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra Rain Live News : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

‘कौन बनेगा करोडपती 17’ ला पहिला करोडपती मिळाला; उत्तराखंडाचा आदित्य कुमारने जिंकली इतकी रक्कम

Viral Video : गोळ्या घालेन... पिस्तूल रोखत धमकावले, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बड्या नेत्याचा कार वर्कशॉपमध्ये राडा

House Renting: घर भाड्याने देताना 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT