Shambhuraj Desai : 'ते' मद्य विक्री केंद्र दहा दिवस बंद ठेवा, मालकांना सांगा... : शंभूराज देसाई

आमच्या मागणीचा प्रशासनाने विचार करावा अन्यथा यापुढे आंदोलनाची तीव्रता वाढवू असा इशारा आंदोलक संघटनांच्या वतीने देण्यात आला हाेता.
shambhuraj desai orders to transfer wine shop from dr ambedkar statue area near dhule
shambhuraj desai orders to transfer wine shop from dr ambedkar statue area near dhule saam tv
Published On

Dhule News :

धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (dr. babasaheb ambedkar) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या पाठीमागच्या बाजूस असलेले मद्य विक्री केंद्र हटवावे या मागणीसाठी आझाद समाज पार्टीच्या वतीने गेल्या दोन महिन्यांपासून धुळे शहरात आंदाेलन, उपाेषण सुरु आहे. या आंदाेलनाची दखल घेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना पुढील दहा दिवस वाईन शॉप बंद ठेवा. तसेच वाईन शॉप मालकांना दुकान तेथून हलवण्याची सूचना करावी असे आदेश दिले अशी माहिती आमदार फारुक शहा (mla farooq shah) यांच्या कार्यालयातून देण्यात आली. (Maharashtra News)

धुळ्यात आझाद समाज पार्टीच्या वतीने गेल्या दोन महिन्यांपासून वाईन शाॅप हटविण्यासाठी आंदोलन केले जात होते. काही दिवसांपूर्वी आझाद समाज पार्टीच्या वतीने वाईन शॉपचा बोर्ड देखील फोडण्यात आला होता.

shambhuraj desai orders to transfer wine shop from dr ambedkar statue area near dhule
Dhule To Ayodhya MSRTC Bus : एसटी महामंडळाची धुळे ते अयाेध्या बस सेवा; जाणून घ्या तिकीट दर

त्यानंतर गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी शहरात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदाेलन देखील झाले. आजाद समाज पार्टीच्या या मागणीला एमआयएमचे धुळे शहराचे आमदार फारुक शहा (mla farooq shah) यांनी पाठिंबा देत या संदर्भात मंत्री महोदयांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्याचाच एक भाग म्हणून आज (गुरुवार) आमदार फारुक शहा यांनी मंत्रालयात उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आंदाेलनाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. त्यानंतर मंत्री देसाईंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आजाद समाज पार्टीच्या आंदोलकांशी चर्चा केली. तसेच मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला हे वाईन शॉप हटविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी अशी सूचना केली.

Edited By : Siddharth Latkar

shambhuraj desai orders to transfer wine shop from dr ambedkar statue area near dhule
Bhandara : 21 लाखांचा घाेटाळा? देव्हाडी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरंपच, ग्रामसेवका विराेधात भंडारा झेडपीत सरपंचांची तक्रार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com