Bhandara : 21 लाखांचा घाेटाळा? देव्हाडी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरंपच, ग्रामसेवका विराेधात भंडारा झेडपीत सरपंचांची तक्रार

सोलर पॅनल बसवून सुध्दा लाखो रूपये विद्युत बिल देव्हाडी ग्रामपंचायत भरत आहे. 21 लाख खर्च करुन सुध्दा 1 युनिट वीज निर्मिती होत नसल्याचे पदाधिका-यांचे म्हणणे आहे.
solar panel issue dewhadi gram panchayat near bhandara
solar panel issue dewhadi gram panchayat near bhandara saam tv
Published On

- शुभम देशमुख

Bhandara News :

भंडारा जिल्ह्याच्या देव्हाडी ग्रामपंचायतीने (dewhadi grampanchayat) पाणी पुरवठा योजनेसाठी 21 लाख रूपये खर्च करुन सोलर पॅनल बसविले. मात्र ही योजना कुचकामी ठरली आहे. याबाबत विद्यमान सरपंच यांनी तत्कालीन सरंपच आणि तत्कालीन ग्रामसेवक यांच्या विराेधात भंडारा जिल्हा परिषदेत तक्रार दिली आहे. दरम्यान या प्रकरणावर तत्कालीन ग्रामसेवक यांनी कॅमेरा समाेर प्रतिक्रिया देण्यास टाळलं. (Maharashtra News)

तुमसर तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत म्हणुन देव्हाडी ग्रामपंचायत गणली जाते. गावात पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. ही पाणी पुरवठा योजना चालविण्यासाठी लाखो रूपये विद्युत बील येते.

solar panel issue dewhadi gram panchayat near bhandara
Ahmednagar Fire News : साई मिडास टच कॉम्प्लेक्सला भीषण आग, रुग्णालय जळून खाक (पाहा व्हिडिओ)

यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने दोन महिन्यांपुर्वी 21 लाख रुपये खर्च करून सोलर पॅनल बसविले. सोलर पॅनल वीज निर्मिती करत आहे की नाही याची खात्री न करत तत्कालीन सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांनी कंत्राटदाराला 21 लाखांचा देय अदा केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोलर पॅनल बसवून सुध्दा लाखो रूपये विद्युत बिल ग्रामपंचायत भरत आहे. 21 लाख खर्च करुन सुध्दा 1 युनिट वीज निर्मिती होत नसल्याचे नवनिर्वाचित सरपंच आशिष टेंबुरकर यांच्या लक्षात आले. त्यांनी या विषयी भंडारा जिल्हा परिषदेकडे तक्रार दिली.

तत्कालीन सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या विषयी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांना विचारले असता त्यांनी काेणतीही प्रतिक्रिया द्यायची नसल्याचे स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

solar panel issue dewhadi gram panchayat near bhandara
Success Story : बिलाेलीमधील शेतकऱ्याने एक एकरातील मिरची पिकातून कमावले लाख रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com