Liquor Serving
Liquor ServingSaam TV

Liquor Serving: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! मद्यविक्रीच्या निर्बंधांबाबत सरकारचा मोठा निर्णय

Liquor Serving Deadline Extended: गृह विभागाच्या आदेशानुसार वाईन शॉप आणि बिअर शॉपमध्ये 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर मध्यरात्री एक वाजेपर्यंत मद्यविक्री करता येणार आहे.
Published on

सागर निकवाडे

Liquor News:

नाताळ आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र तयारी सुरू आहे. अनेक जण डिसेंबर महिन्यातील हे दोन दिवस विविध पद्धतीने आनंद व्यक्त करत साजरा करतात. अनेक जण या दोन्ही दिवसांत मद्यपान करतात. तर अशा मद्यप्रेमी व्यक्तींसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Liquor Serving
Poisonous Gas Leak: 'रक्षाबंधना'दिवशी काळाचा घाला! फूड फॅक्टरीमध्ये विषारी वायू गळती; तीन भावांसह ५ जणांचा मृत्यू

नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने 25 डिसेंबर ते 31 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत मद्यविक्री करण्याची परवानगी देण्यात आलीये. पहाटेपर्यंत मद्यविक्रीस परवानगी दिल्याने मद्यप्रेमिंनी यावर आनंद व्यक्त केलाय.

https://i.ytimg.com/an_webp/Vo20s5PtYHE/mqdefault_6s.webp?du=3000&sqp=CImlpKwG&rs=AOn4CLAn-UuiZdbNSk6SdVdyqeFKlYCs1g

दरवर्षी नाताळ आणि नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात येत असते. त्यामुळे गृह विभागाने या आठवड्यात दोन दिवसांमध्ये मद्यविक्रीची वेळ वाढवून दिली आहे. गृह विभागाच्या आदेशानुसार वाईन शॉप आणि बिअर शॉपमध्ये 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर मध्यरात्री एक वाजेपर्यंत मद्यविक्री करता येणार आहे.

यासोबतच परमिट रूम पहाटे पाच वाजेपर्यंत खुले असतील. पार्टी आणि क्लब यांची वेळ पहाटे पाचपर्यंत निर्धारित करण्यात आलेली आहे. शासनाच्या महसूल बुडवणाऱ्या बनावट आणि बेकायदेशीर मद्यविक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष असणार आहे.

मद्यपान केल्यास या पदार्थांचे सेवन करू नका

मद्यपान करताना अनेक व्यक्ती त्यासोबत विविध पदार्थ खातात. मात्र अशावेळी ठरावीक पदार्थ आहारातून वगळणे किंवा टाळणे गरजेचे आहे. मद्यपान करण्याआधी किंवा त्यानंतर कॉफीसे सेवन करू नका. दुग्धजन्य पदार्थ, पिझ्झा, चॉकलेट, ब्रेड असे पदार्थ खाणे टाळलं पाहिजे.

Liquor Serving
Health Tips in Christmas: क्रिसमस पार्टीत दारू पिताना 'हे' पदार्थ खाणं आरोग्यासाठी घातक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com