Bihar Crime Saam Tv
क्राईम

Crime: साडेतीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार, प्रायव्हेट पार्टवर गंभीर जखमा; १४ वर्षांच्या चुलत भावाचं भयंकर कृत्य

Bihar Crime: बिहारमध्ये साडेतीन वर्षांच्या मुलीवर चुलत भावाने बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी १४ वर्षीय मुलाला ताब्यात घेतलं. या घटनेमुळे बिहार हादरले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Priya More

Summary -

  • बिहारमध्ये साडेतीन वर्षांच्या मुलीवरील बलात्कार

  • आरोपी पीडित मुलीचा चुलत भाऊ

  • पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं

  • पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली

बिहारमध्ये साडेतीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. १४ वर्षांच्या चुलत भावाने तिच्यासोबत हे भयंकर कृत्य केले. मुजफ्फरपूर जिल्ह्यातील एका गावात १४ एप्रिल रोजी ही घटना घडली. आरोपीने चिमुकलीवर बलात्कार केला. तिच्या प्रायव्हेट पार्टवर अनेक जखमा आढळून आल्या. आरोपीने पीडित मुलीला रक्तबंबाळ अवस्थेत घरी आणून सोडले. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलं.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी पीडित मुलीची आई रेशन आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने मुलीला घरातून बोलावून सोबत नेले होते. जेव्हा महिला घरी परत आली तेव्हा तिची मुलगी आजीजवळ बसली होती. तिच्या गुप्तांगातून रक्त येत होते. मुलीला विचारले असता तिने चुलत भावाने केलेल्या भयंकर कृत्याबद्दल आईला सांगितले. महिला पीडित मुलीला घेऊन आरोपीच्या घरी जाब विचारण्यासाठी गेली. तेव्हा आरोपीच्या कुटुंबीयांनी तिच्यावर उपचार करून देतो असे सांगितले.

पीडित मुलीला तात्काळ रुग्णालयातSummary Points (Marathi)

  • बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना

  • पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं

  • POCSO कायद्यांतर्गत तपास सुरू

  • बालसुरक्षेबाबत जागरूकता आवश्यक दाखल करण्यात आले. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. आरोपीने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलं. या प्रकरणाचा पोलिस कसून तपास करत आहेत.

दरम्यान, कर्जा पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात ३ वर्षांपूर्वी एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या दोन तरुणांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. राजकिशोर महातो (२८ वर्षे) आणि सीतम कुमार महातो (२३ वर्षे) या आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपींना प्रत्येकी २०,००० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT