Nesco Drug Party: पोरगा ड्रग्जमाफिया, बाप रेशन माफिया; नेस्को पार्टीत ड्रग्ज पुरवणाऱ्या पटेलचा बाप निघाला अट्टल गुन्हेगार

Nesco Drug Party Case Update: गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या तरुण-तरुणींनी ड्रग्ज घेतले होते. त्यांना ड्रग्ज पुरवणाऱ्या कल्याणच्या आनंद पटेलला पोलिसांनी अटक केली. त्याच्याबद्दल धक्कादायक माहिती उघड झाली.
Nesco Drug Party: पोरगा ड्रग्जमाफिया, बाप रेशन माफिया; नेस्को पार्टीत ड्रग्ज पुरवणाऱ्या पटेलचा बाप निघाला अट्टल गुन्हेगार
Nesco Drug Party Case Saam Tv
Published On

Summary -

  • नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठा खुलासा

  • ड्रग्ज पुरवणाऱ्या मुख्य आरोपी आनंद पटेलला पोलिसांनी केली अटक

  • त्याचे वडील लखन पटेल याची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी

  • ड्रग्ज रॅकेटमधील इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या म्युझिक कॉन्सर्टदरम्यान ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. या कॉन्सर्टवेळी झालेल्या ड्रग्ज पार्टीमध्ये अनेक तरुण-तरुणींनी ड्रग्ज घेतले होते. या तरुण-तरुणींना कल्याणमधून ड्रग्ज पुरवण्यात आले होते. हे ड्रग्ज पुरवणाऱ्या आनंद पटेलला पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या आनंद पटेल याच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आनंद पटेलचे वडील लखन पटेल हे देखील सराईत गुन्हेगार असून रेशनिंग माफिया म्हणून परिसरात त्यांची ओळख असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन पटेलच्याविरोधात कल्याण आणि आसपासच्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार तसेच संघटित गुन्हेगारीशी संबंधित गंभीर प्रकरणांमध्ये त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे.

Nesco Drug Party: पोरगा ड्रग्जमाफिया, बाप रेशन माफिया; नेस्को पार्टीत ड्रग्ज पुरवणाऱ्या पटेलचा बाप निघाला अट्टल गुन्हेगार
Mumbai drug case : मुंबईतील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग ओव्हरडोसमुळे २ विद्यार्थ्यांचा मृत्यू; ५ जणांना अटक

नेस्को ड्रग्स पार्टी प्रकरणात लखनचा मुलगा आनंद पटेलला अटक झाल्यानंतर तो राहत असलेल्या मोहन हाईट्स परिसरात खळबळ उडाली आहे. या उच्चभ्रू सोसायटीतील रहिवाशांना या प्रकरणामुळे मोठा धक्का बसला असून पटेल कुटुंबाच्या पार्श्वभूमीबाबत समोर येत असलेल्या माहितींमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Nesco Drug Party: पोरगा ड्रग्जमाफिया, बाप रेशन माफिया; नेस्को पार्टीत ड्रग्ज पुरवणाऱ्या पटेलचा बाप निघाला अट्टल गुन्हेगार
Mumbai crime : मुंबई हादरली! एकाच दिवशी ३ जणांची निर्घृण हत्या, एकाला तर बायकोसमोरच संपवला

लखन पटेल हा आधीपासूनच गुन्हेगारी विश्वात सक्रिय असल्याची चर्चा असताना आता त्याचा मुलगा आनंद पटेल देखील एवढ्या मोठ्या ड्रग्स प्रकरणात अडकल्याने स्थानिकांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा तपास सध्या पोलिस अधिकाऱ्यांकडून सुरू असून ड्रग्स रॅकेटमधील इतर संबंधित आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Nesco Drug Party: पोरगा ड्रग्जमाफिया, बाप रेशन माफिया; नेस्को पार्टीत ड्रग्ज पुरवणाऱ्या पटेलचा बाप निघाला अट्टल गुन्हेगार
Mumbai Drugs Party: ड्रग्जच्या नशेत धुंद तरुण-तरुणी, हातात दारू अन् सिगारेट; नेस्को कॉन्सर्टमधील धक्कादायक VIDEO समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com