Mumbai Drugs Party: ड्रग्जच्या नशेत धुंद तरुण-तरुणी, हातात दारू अन् सिगारेट; नेस्को कॉन्सर्टमधील धक्कादायक VIDEO समोर

Mumbai Drugs Party Video: गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान ड्रग्ज पार्टी झाली होती. ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोघांचा मृत्यू झाला. या कॉन्सर्टनंतर पार्कींगमध्ये नशेत धुंद तरुण-तरुणींचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
Mumbai Drugs Party: ड्रग्जच्या नशेत धुंद तरुण-तरुणी, हातात दारू अन् सिगारेट; नेस्को कॉन्सर्टमधील धक्कादायक VIDEO समोर
Mumbai Drugs PartySaam Tv
Published On

Summary -

  • नेस्को कॉन्सर्टमधील धक्कादायक व्हिडिओ समोर

  • ड्रग्ज ओव्हरडोसने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

  • या प्रकरणी ६ जणांना पोलिसांनी अटक केली

  • या प्रकरणाचा गोरेगाव पोलिस तपास करत आहेत

मुंबईतल्या गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या म्युझिक कॉन्सर्टदरम्यान ड्रग्ज पार्टी झाल्याचे प्रकरण समोर आले. ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे दोघांचा मृत्यू झाला यामध्ये एक तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे. तर एका तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गोरेगावच्या वनराई पोलिसांनी आतापर्यंत ६ जणांना अटक केली. हे प्रकरण समोर आल्यानंतर मुंबईत खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पोलिस कसून तपास करत आहेत. अशामध्ये या म्युझिक कॉन्सर्टदरम्यानचा नशेमध्ये धुंद तरुण-तरुणींचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

नेस्को सेंटरमधील कॉन्सर्टचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. पार्टीनंतर पार्किंगमध्ये तरुण-तरुणी अर्धनग्न अवस्थेत नशा करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. काहींच्या हातामध्ये दारूच्या बाटल्या तर काही जण सिगारेट ओढताना या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. या तरुणांच्या हातामध्ये असलेली सिगारेट सारखी दिसणारी वस्तू ही सिगारेटच आहे की आणखी काय याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

Mumbai Drugs Party: ड्रग्जच्या नशेत धुंद तरुण-तरुणी, हातात दारू अन् सिगारेट; नेस्को कॉन्सर्टमधील धक्कादायक VIDEO समोर
Mumbai: मुंबई हादरली! लाइव्ह कॉन्सर्टमध्ये २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ड्रग्जच्या ओव्हर डोसने घेतला जीव

या म्युझिक कॉन्सर्टदरम्यान काहींनी ड्रग्ज पार्टी केल्याची शक्यता आहे. कारण ड्र्ग्जच्या अतिसेवनामुळे काही जणांची प्रकृती बिघडली. तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण यामधील एक तरुण आणि एका तरुणीचा मृत्यू झाला. तर एका तरुणीवर उपचार सुरू आहेत. या कॉन्सर्टनंतर अनेकांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्याचा ही अंदाज आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

Mumbai Drugs Party: ड्रग्जच्या नशेत धुंद तरुण-तरुणी, हातात दारू अन् सिगारेट; नेस्को कॉन्सर्टमधील धक्कादायक VIDEO समोर
Mumbai drug case : मुंबईतील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग ओव्हरडोसमुळे २ विद्यार्थ्यांचा मृत्यू; ५ जणांना अटक

या म्युझिक कॉन्सर्टमध्ये मुंबईतल्या वेगवेगळ्या नामांकित कॉलेजचे तीन ते चार हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यामधील काही विद्यार्थ्यांनी इव्हेंटला येताना कॅबमध्येच ड्रग्सच्या गोळ्या घेतल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांकडून एमडीएम या ड्रग्स घेतल्याची सूत्रांनी माहिती दिली. काही विद्यार्थ्यांनी २ गोळ्या घेतल्याने ओव्हरडोस झाला आणि त्यांची प्रकृती बिघडली. विद्यार्थ्याने हे ड्रग्स कल्याण परिसरातून मागवले होते.

Mumbai Drugs Party: ड्रग्जच्या नशेत धुंद तरुण-तरुणी, हातात दारू अन् सिगारेट; नेस्को कॉन्सर्टमधील धक्कादायक VIDEO समोर
Mumbai Local Train: मोठ्या खिडक्या, १,००३ सीट्स अन् ५ हजार ७०० प्रवासी क्षमता; कशी आहे ऑटोमॅटिक दरवाजाची लोकल ट्रेन

या प्रकरणात कॉलेजमधील तरुणांकडून ड्रग्सचा वापर स्पष्ट दिसून येत आहे. पोलिसांनी नेस्कोशी संबंधित ३ जणांना आणि एक सुरक्षारक्षकासह २ विद्यार्थ्यांना अटक केली. आरोपींकडून ६ ते ७ ड्रग्स टॅबलेट जप्त केले आहेत. विद्यार्थ्यांना ड्रग्स पुरवणाऱ्या व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली. एकूण १५ ते १६ विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास वनराई पोलिसांकडून सुरू आहे.

Mumbai Drugs Party: ड्रग्जच्या नशेत धुंद तरुण-तरुणी, हातात दारू अन् सिगारेट; नेस्को कॉन्सर्टमधील धक्कादायक VIDEO समोर
Mumbai crime : मुंबई हादरली! एकाच दिवशी ३ जणांची निर्घृण हत्या, एकाला तर बायकोसमोरच संपवला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com