Asha Bhosale: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती बिघडली; मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू

Asha Bhosle Has Suffered A Heart Attack : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती झटका बिघडली आहे. त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले आहे.
Asha Bhosle
Asha BhosleSaam Tv
Published On

Asha Bhosale: भारतीय संगीतसृष्टीतील ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समजते.

आपल्या जादुई आवाजानं रसिकांवर मोहिनी घालणाऱ्या गायिका आशा भोसले यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त आहे. त्यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. रुग्णालय व्यवस्थापनाकडून त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आशा भोसले या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि बहुमुखी गायिकांपैकी एक आहेत.

Asha Bhosle
Ranveer Singh: रणवीर सिंगच्या अडचणी संपेना; आता हायकोर्टाकडून नवा आदेश, नेमकं काय घडलं?

कुटुंबीयांकडूनही प्रकृतीबाबत माहिती नाही

आशा भोसले यांची प्रकृती बिघडल्याचे समजताच रुग्णालयाबाहेर प्रसारमाध्यमांचे अनेक प्रतिनिधी पोहोचले. मात्र, आशा भोसले यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. आशाताईंची प्रकृती बिघडल्याचे समजताच त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला. आशा या हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध पार्श्वगायिका आहेत. त्यांचे वडील, दीनानाथ मंगेशकर, हेही एक प्रसिद्ध गायक आणि अभिनेते होते. त्यांनी आशा भोसले यांना अगदी लहान वयातच शास्त्रीय संगीताचे शिक्षण दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com