Zelio Launches Little Gracy Saam tv
बिझनेस

license free electric scooter : परवान्याची गरज नसलेली हटके इ स्कूटर; जाणून घ्या किंमत, बॅटरी आणि बरंच काही

Zelio Launches Little Gracy : परवान्याची गरज नसलेली हटके इ स्कूटर बाजारात आली आहे. या इ-स्कुटरची किंमत इतर स्कुटरच्या तुलनेत परवडणारी आहे.

Saam Tv

मुंबई : झेलिओ ई मोबिलिटी कंपनीने नवीनतम मॉडेल, लिटिल ग्रेसी, या कमी वेगाच्या, नॉन-आरटीओ इलेक्ट्रिक स्कूटरचे अनावरण केले आहे. ही इ स्कूटर विशेषतः १०-१८ वयोगटातील तरुण रायडर्ससाठी तयार करण्यात आलीये. कंपनीकडून स्कुटर बाजारात आणून तरुण लोकसंख्येला लक्ष्य करण्यात आले आहे. या इ-स्कुटरला ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नाही. ही स्कूटर एक विश्वासार्ह, पर्यावरणपूरक आणि सोयीस्कर वाहतुकीचा मार्ग शोधणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांसाठी एक आदर्श पर्याय आहे.

लिटिल ग्रेसी तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. लिटिल ग्रेसी इ स्कूटरची किंमत ४९,५०० रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ४८व्ही/३२एएच लीड अ‍ॅसिड बॅटरीची किंमत ४९,५०० रुपये आहे. ती ७-८ तासांच्या चार्जिंग वेळेसह ५५-६० कि.मी. ची रेंज देते. ६०व्ही/३२एएच लीड अ‍ॅसिड बॅटरीची किंमत ५२,००० रुपये आहे. ही स्कुटर ७-९ तासांच्या चार्जिंग वेळेसह ७० कि.मी. ची रेंज देते. तर ६०व्ही/३०एएच लीथियम-आयन बॅटरीची किंमत ५८,००० रुपये आहे. ती ८-९ तासांच्या चार्जिंग वेळेसह ७०-७५ कि.मी. ची रेंज देते.

झेलिओ ई मोबिलिटी लिमिटेडचे सह-संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक कुणाल आर्य यांनी म्हटलं, 'लिटिल ग्रेसी स्कुटर तरुण रायडर्ससाठी टिकाऊ वाहतूक देखील सुलभ करते. आमचे ध्येय भारतातील दैनंदिन जीवनाचा एक भाग, इलेक्ट्रिक मोबिलिटी बनवणे हे राहिले आहे. लिटिल ग्रेसी आम्हाला त्याकडे एक पाऊल जवळ घेऊन जाते. ही एक पर्यावरणपूरक, परवडणारी आणि परवान्याची गरज नसलेली स्कूटर आहे. जी आमच्या तरुण रायडर्सच्या विशिष्ट गरजा पूर्ण करते'.

प्रत्येक मॉडेल हे ४८/६०व्ही बीएलडीसी मोटरने सुसज्ज असून त्याचे वजन ८० किलो आहे. त्याची लोडिंग क्षमता ८० किलो आहे. २५ कि.मी./तास कमाल वेग आणि प्रति चार्ज फक्त १.५ युनिट वीज आहे. या स्कूटरमध्ये डिजिटल मीटर, यूएसबी पोर्ट, चावीविरहित ड्राइव्ह, अँटी-थेफ्ट अलार्मसह सेंटर लॉक, रिव्हर्स गियर, पार्किंग स्विच आणि ऑटो-रिपेअर स्विच अशा आधुनिक सुविधा आहेत. यामध्ये हायड्रॉलिक सस्पेंशन असून पुढील आणि मागील दोन्ही बाजूंना ड्रम ब्रेक्स देखील समाविष्ट आहेत. ते गुलाबी, तपकिरी/क्रीम, पांढरा/निळा आणि पिवळा/हिरवा या चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत. लिटिल ग्रेसीमध्ये मोटर, कंट्रोलर आणि फ्रेमवर दोन वर्षांची वॉरंटी देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT