Ladki Bahin Yojana : शेतकरी सन्मान योजनेचा लाडक्या बहिणींना धक्का; १५०० रुपयांऐवजी ५०० मिळणार? VIDEO

Ladki Bahin Yojana update : आता लाडक्या बहीणीला अवघे 500 रुपयेच मिळणार आहेत...ज्या महिला लाभार्थी इतर योजनांचा लाभ घेतात आता त्यांना 1500 ऐवजी अवघे 500 रुपये मिळणार आहेत. यात कोणत्या योजनांच्या लाभार्थींचा समावेश आहे पाहूया....
Ladki Bahin Yojana update
Ladki Bahin YojanaSaam tv
Published On

राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला लाभार्थी शेतकरी सन्मान निधी योजनांचाही लाभ घेतात. त्यांना आता दरमहा दीड हजार रुपयांऐवजी अवघे 500 रुपयेच मिळणार आहेत. त्यामुळे शेतकरी सन्मान निधीचा धक्का लाडकीला बसण्याची शक्यता आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून 6 हजार

राज्याच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून 6 हजार

एकूण 12 हजार रुपये दरवर्षी शेतकरी लाभार्थ्याच्या खात्यात

राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर योजनेत सुसूत्रता आणण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले होते.. तर त्यानंतर नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थी असलेल्या 20 लाख लाडक्या बहीणींना वगळण्यात येण्याची चर्चा रंगली.. मात्र अखेर राज्य सरकारने त्यावर तोडगा काढत लाडक्या बहीणीचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेतील फरकाचा आधार घेत महिला शेतकऱ्यांना दीड हजार ऐवजी 500 रुपयेच देण्याच्या हालचाली सुरु केल्या... मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सरकार लाडक्या बहीणींना एकवीसशे रुपये देणार असल्याचं म्हटलंय.

Ladki Bahin Yojana update
Myanmar Earthquake : म्यानमार पुन्हा भूकंपाने हादरलं; आतापर्यंत १००० हून अधिक जणांचा मृत्यू, २३७६ जखमी

महायुती सरकारच्या विजयात सर्वात मोठा वाटा शेतकरी लाडक्या बहीणींचा होता.. मात्र आता शेतकरी लाडक्या बहीणींच्या लाभावरच सरकार कुऱ्हाड चालवणार असेल तर त्याचा फटका आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com