Udaipur Tourism : शाही थाट अन् रोमँटिक वातावरण, आयुष्यात एकदा तरी पाहा उदयपूरमधील 'ही' 8 ठिकाणे

Shreya Maskar

सिटी पॅलेस

सिटी पॅलेस हा उदयपूरमधील सर्वात मोठा आणि भव्य राजवाडा आहे. याचे बांधकाम 16व्या शतकात महाराणा उदयसिंह यांनी सुरू केले. येथे राजपूत आणि मुघल स्थापत्यशैलीचा सुंदर संगम पाहायला मिळतो. सिटी पॅलेस पिचोला तलावाच्या काठावर वसलेला आहे.

City Palace | instagram

पिचोला सरोवर

पिचोला सरोवर हा कृत्रिम तलाव 1362 मध्ये तयार करण्यात आला. पिचोला सरोवर बोटिंगसाठी प्रसिद्ध आहे. येथे सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. पिचोला सरोवराच्या मध्यभागी लेक पॅलेस आहे.

Lake | instagram

सज्जनगड मान्सून पॅलेस

सज्जनगड मान्सून पॅलेस एका टेकडीवर वसलेला आहे. 19 व्या शतकातील हा राजवाड्यातून पिचोला सरोवर आणि शहराचे मनमोहक दृश्य दिसते. येथे सज्जनगड मान्सून पॅलेसवरून दिसणारा सूर्यास्त खरोखरच अद्भुत आणि विलोभनीय असतो.

Sajjangad Monsoon Palace | instagram

गुलाब बाग

गुलाब बाग ही उदयपूरमधील सर्वात मोठी बाग आहे. येथे विविध प्रकारची फुले आणि वनस्पती पाहायला मिळतात. तुम्ही येथे सुंदर फोटोशूट देखील करू शकता. येथे जवळच छोटे प्राणी संग्रहालय आणि वाचनालय आहे.

Rose Garden | instagram

ताज लेक पॅलेस

पिचोला तलावाच्या मध्यभागी असलेला ताज लेक पॅलेस पांढऱ्या संगमरवरी दगडाचा राजवाडा आहे. येथे जायचे असल्यास बोटीने प्रवास करावा लागतो.

Taj Lake Palace | instagram

जगदीश मंदिर

जगदीश मंदिर 1651 मध्ये बांधलेले प्राचीन हिंदू मंदिर आहे. हे भगवान विष्णूंना समर्पित आहे. तसेच कोरीव काम आणि शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे.

Temple | instagram

बगोरे की हवेली

बगोरे की हवेली ही 18व्या शतकातील ऐतिहासिक हवेली आहे. येथे मेवाड संस्कृतीचे प्रदर्शन पाहायला मिळते. संध्याकाळी लोकनृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात.

Bagore Ki Haveli | instagram

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत.

Udaipur | instagram

NEXT : रेल्वे, बस की कार? तुळजापूरला जाण्याचा सोपा अन् स्वस्तात मस्त मार्ग कोणता?

Mumbai To Tuljapur | saam tv
येथे क्लिक करा...