Shreya Maskar
तुळजापूर येथे अनेक धार्मिक स्थळे आहेत. ज्यात तुळजाभवानी मंदिर, घटशिला मंदिर आहे. वीकेंडला, नवरात्रीला येथे भाविकांची गर्दी पाहायला मिळते.
मुंबई ते तुळजापूर हा साधारण ४००-४२० किमीचा प्रवास आहे. जवळपास १०-१२ तासांत हा प्रवास पूर्ण करता येतो. तुम्ही येथे रेल्वे, बस, विमान, स्वतःच्या कारने जाऊ शकता.
तुळजापूरला जाण्यासाठी सोलापूर हे सर्वात जवळचे प्रमुख रेल्वे स्टेशन आहे. स्टेशनला उतरून तुम्ही कॅब किंवा बसने पुढे जाऊ शकता. तसेच स्टेशनबाहेर तुळजापूरला जाण्यासाठी खाजगी वाहने सहज मिळतात.
स्वतःच्या गाडीने मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून पुणे-सोलापूर हायवेमार्गे तुळजापूरला जाणे सोयीचे आहे. साधारण ७-८ तासांचा प्रवास असू शकतो.
तुळजापूरला जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ सोलापूर आहे, पण तिथे जाण्यासाठी मर्यादित विमाने आहेत.
मुंबई ते तुळजापूरला जाण्यासाठी दादर, बोरिवली, ठाणे इथून संध्याकाळी निघणाऱ्या स्लीपर/एसी बस असतात. तिकीट दर ६०० ते ३५०० रुपयांपर्यंत असू शकतो.
मुंबई ते तुळजापूरला जाण्यासाठी बस हा सर्वात उत्तम मार्ग आहे. खाजगी आणि राज्य परिवहन (MSRTC) बसेने तुम्ही येथे पोहचू शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत.