Beed Tourism : प्राचीन इतिहासाचे वैभव जपतोय बीडमधील 'हा' किल्ला, पाहायला मिळेल स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना

Shreya Maskar

बीड

महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेला बीड जिल्हा हा ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक समृद्धी आणि भौगोलिक वैविध्याचा अनोखा संगम आहे. सुट्टींमध्ये बीडची एकदा नक्की सफर करा.

Beed | google

धारूर किल्ला

धारूर किल्ला हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात स्थित आहे. धारूर किल्ल्याला 'महादुर्गा' असेही म्हणतात.

Fort | google

किल्ल्याची तटबंदी

धारूर किल्ल्याला दुहेरी किंवा तिहेरी तटबंदी आणि भोवतालची खोल खंदक सुरक्षा कवच म्हणून लाभली आहेत. किल्ल्याच्या तीन बाजूंनी नैसर्गिक खोल दऱ्या आहेत आणि पूर्व बाजूने खोल खंदक असल्याने तो अभेद्य बनला होता.

Fort | google

कोणी बांधला?

बीड जिल्ह्यातील धारूरचा किल्ला (पूर्वीचे धारूर) हा अदिलशाही सरदार किश्वरखान लारी याने बांधलेला आहे. हा किल्ला निजामशाहीला शह देण्यासाठी बांधला गेला होता.

Fort | google

वास्तुकला

धारूर किल्ला राष्ट्रकूट काळातील (८व्या-१०व्या शतकातील) प्राचीन लष्करी वास्तुकलासाठी प्रसिद्ध आहे. किल्ल्याच्या परिसरातून निसर्गाचे विहंगम दृश्ये पाहायला मिळते.

Fort | google

धारूर किल्ल्यात काय काय होते?

धारूर किल्ल्यात गोडी दिंडी (पाण्याचा टाका), रंगमहाल, हमामखाना, दारुखाना, हवामहल, जुनी मशीद आणि तीन मोठ्या विहिरी आहेत.

Fort | google

बीड पर्यटन स्थळे

बीड जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक, धार्मिक आणि पिकनिक स्पॉट आहेत. यात अंबाजोगाई, कंकालेश्वर मंदिर, कपिलधार धबधबा, सौताडा धबधबा आणि नायगाव मोर अभयारण्य ही प्रमुख पर्यटन आणि तीर्थक्षेत्रे आहेत.

Fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | google

NEXT : रुपेरी वाळू सोनेरी लाटा...; कोकणात 'येथे' घ्या रोमांचक जलक्रीडांचा अनुभव

Sindhudurg Tourism | saam tv
येथे क्लिक करा...