Sindhudurg Tourism : रुपेरी वाळू सोनेरी लाटा...; कोकणात 'येथे' घ्या रोमांचक जलक्रीडांचा अनुभव

Shreya Maskar

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात देवबाग हा सुंदर, शांत समुद्रकिनारा आहे. हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे वॉटर स्पोर्ट्सचा अनुभव घेता येतो.

Sindhudurg | google

देवबाग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग बीच परदेशी पर्यटकांचेही आकर्षण आहे. देवबाग बीचवर निळेशार पाणी, पांढरी वाळू पाहायला मिळते.

Devbagh | yandex

कधी जावे?

हिवाळ्यात आणि पावसाळ्यात देवबाग बीचला भेट द्या. येथे तु्म्ही निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवू शकता. तसेच भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.

Devbagh | yandex

पर्यटन स्थळे

देवबाग येथे गेल्यावर सुनामी बेट, डॉल्फिन पॉइंट, कर्ली नदीचा संगम पाहायला मिळतो. तसेच येथे तारकर्ली बीच, भोगवे बीच, निवती किल्ला आणि सिंधुदुर्ग किल्ला ही पर्यटन स्थळे आहेत.

Devbagh | yandex

जलक्रीडांचा अनुभव

सुनामी बेट हे थरारक वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे. येथे जेट स्कीइंग, बनाना बोट, बंपर राईड, कायकिंग , स्कूबा डायव्हिंग आणि बोटिंगचा आनंद घेता येतो.

water sports | yandex

डॉल्फिन पॉइंट

देवबाग बीच येथे अतिशय प्रसिद्ध डॉल्फिन पॉइंट आहे. पर्यटकांना बोटीने समुद्रात जाऊन डॉल्फिन पाहण्याची संधी मिळते.

Dolphin Point | yandex

सूर्यास्त

देवबाग बीचवरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तसेच देवबाग येथे कोकणी खाद्यसंस्कृती चाखायला मिळते. येथे स्वादिष्ट सी-फूड जेवणाचा आनंद घेता येतो. त्यामुळे येथे नक्की जा.

Sunset | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Devbagh | yandex

NEXT : कसारा घाटाजवळ लपलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला, ट्रेकिंग करताना दिसतो कळसूबाई शिखराचा सुंदर नजारा

Maharashtra Tourism | yandex
येथे क्लिक करा...