Shreya Maskar
महाराष्ट्रातील किल्ले इतिहास जपतात. महाराष्ट्रात अनेक हिडन किल्ले आहेत. त्यातील एक म्हणजे बलवंतगड किल्ला. हा किल्ल्यावरून निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
बलवंतगड किल्ला किंवा बलवंतगड हा महाराष्ट्रातील विहिगाव आणि कसारा घाट जवळ आहे. हा एक डोंगरी किल्ला आहे.
बलवंतगड किल्ल्यावरून कळसूबाई शिखराचे सुंदर दृश्य दिसते. बलवंतगड किल्ला हा ट्रेकिंगसाठी बेस्ट ऑप्शन आहे.
बलवंतगड किल्ला हा थळ खिंडीवर एक टेहळणी बुरुज म्हणून काम करतो. बळवंतगड किल्ल्यावरून कसारा घाटाचे विलोभनीय दृश्य दिसते. कल्याण, सोपारा, डहाणू बंदरांकडे होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला महत्त्वाचा होता.
कसारा रेल्वे स्टेशनवरून तुम्ही रिक्षा किंवा बसने बळवंतगड किल्ल्याला जाऊ शकता. वन डे ट्रिपसाठी हे बेस्ट लोकेशन आहे. जेथे तुम्ही निसर्गाचा सुंदर नजारा पाहाल.
बलवंतगड किल्ल्याला तीन बुरुज आहेत. पूर्वेला दोन आणि पश्चिमेला एक आहे. या किल्ल्याचा मोठा इतिहास आहे. तुम्ही येथे मित्रांसोबत नक्कीच ट्रिप प्लान करा.
कसारा घाटाजवळ इगतपुरी हिल स्टेशन, सांधण व्हॅली, विहिगाव धबधबा , घाटनदेवी मंदिर, उंट दरी आणि त्रिंगलवाडी किल्ला ही पर्यटन स्थळे आहेत. येथील निसर्ग सौंदर्य जगात भारी आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.