Satara Tourism : बोटीतून पाहा सह्याद्रीचे सुंदर नजारे, साताऱ्यात आहे 'हे' खास लोकेशन

Shreya Maskar

सातारा

धोम धरण हे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात, कृष्णा नदीवर वसलेले आहे. धोम धरण माती आणि दगडांचा वापर करून तयार करण्यात आले आहे.

Satara Tourism | google

बोटिंग

१९७७-८२ दरम्यान बांधलेले हे धोम धरण पर्यटन, बोटिंग आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही लहान मुलांसोबत नक्कीच ट्रिप प्लान करू शकता.

boating | yandex

वॉटर स्पोर्ट्स

तुम्ही येथे वॉटर स्पोर्ट्सचा तुफान आनंद घेऊ शकता. वॉटर स्पोर्ट्समध्ये स्पीड बोटी, बनाना राइड अशा अनेक गोष्टी करता येतात.

Water Sports | google

धरणाची उंची

धोम धरणाची उंची ५० मीटर (सुमारे १६० फूट) इतकी आहे. तसेच त्याची लांबी २,४७८ मीटर आहे. येथे गेल्यावर तुम्हाला सुंदर निसर्ग पाहायला मिळेल.

Satara | google

पर्यटन स्थळे

धोम धरणजवळ महाबळेश्वर आणि पाचगणी ही पर्यटन स्थळे आहेत. तुम्ही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात धोम धरणला नक्की भेट द्या. थंड वातावरण अनुभवता येते.

Satara | google

चित्रपटाचे शूटिंग

धोम धरण हे बॉलिवूडचे लोकप्रिय शूटिंग ठिकाण आहे. येथे स्वदेस, दबंग, चेन्नई एक्सप्रेस,, सिंघम, बोल बच्चन यांसारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे शूटिंग झाले आहे.

movie shooting | yandex

सह्याद्री

धोम धरणाच्या बाजूला सह्याद्रीच्या टेकड्या आणि सुंदर निसर्ग पाहायला मिळतो. तसेच धोम धरणाच्या जवळ नृसिंह मंदिर आहे. जे खूप सुंदर आहे.

Satara | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Satara | google

Pune Tourism : मराठ्यांचा पराक्रम, शौर्य अन् स्वाभिमानाचे प्रतीक पुण्यातील 'हा' किल्ला; आजही जपतोय ऐतिहासिक वारसा

Pune Tourism | google
येथे क्लिक करा