Shreya Maskar
वीकेंडला मुंबईजवळ पुण्यात ट्रिप प्लान करा. येथील ऐतिहासिक ठिकाणांना फॅमिलीसोबत भेट द्या. तसेच पुन्हा एकदा इतिहासाची उजळणी करा.
पुणे जिल्ह्यातील चाकण येथे 'चाकण किल्ला' आहे. ज्याला 'संग्रामदुर्ग' म्हणून ओळखले जाते. हा एक ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. वीकेंडला येथे नक्की भेट द्या.
चाकण किल्ला फिरांगोजी नरसाळा यांनी मुघल सरदार शाहिस्तेखानाशी दिलेल्या लढ्यासाठी प्रसिद्ध आहे. किल्ल्यावर मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा लिहिली गेली.
चाकण किल्ला १४ व्या शतकात बांधलेला आहे. तो भक्कम तटबंदी, अनेक बुरुज आणि पाण्याने भरलेल्या खोल खंदकाने सुरक्षित होता.
चाकण किल्ल्याच्या परिसरात चक्रेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिर परिसरात महादेवाच्या स्वयंभू पिंडीसोबतच, विष्णूचे दुर्मिळ वराह अवतार, प्राचीन मूर्ती आणि अवशेष आढळतात.
चाकण किल्ला चौकोनी आकाराचा असून, किल्ल्याची तटबंदी ४० ते ५० फूट उंच आहे. तटबंदीच्या खालच्या भागात दगड आणि वरील भागात विटांचे बांधकाम करण्यात आले आहे.
शनिवारवाडा, लाल महाल, आगाखान पॅलेस, सिंहगड किल्ला आणि पाताळेश्वर लेणी ही पुण्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणे आहेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.