Shreya Maskar
तुम्हाला कामाच्या धावपळीतून निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवायचा असेल तर आवर्जून कोकण वारी करा. तुम्हाला येथे स्वर्गाहून सुंदर नजारा पाहायला मिळेल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात असलेला वायंगणी बीच हा शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य किनारा आहे. हिरवीगार झाडी, मऊ वाळू आणि निळ्याशार पाण्यामुळे पर्यटकांना आकर्षित करतो.
वायंगणी बीचला सूर्यास्त पाहणे हा एक सुखद अनुभव ठरतो. तसेच येथे तुम्ही भन्नाट फोटोशूट देखील करू शकता. सुट्टीत येथे नक्की जा.
वायंगणी बीच पांढरी वाळू, स्वच्छ पाणी आणि नारळ-सुपारीच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. गर्दीपासून दूर तुम्हाला निवांत वेळ घालवायचा असेल तर हे उत्तम ठिकाण आहे.
हिवाळ्यात आणि पावसाळ्यात वायंगणी बीचला नक्की भेट द्या. वेंगुर्ला येथे आल्यावर तुम्ही रिक्षा किंवा बसने वायंगणी बीचपर्यंत पोहचू शकता.
वायंगणी बीचला खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे. येथे गेल्यावर कोकणी जेवण आणि ताज्या माशांचे जेवण तुम्हाला खायला मिळेल.
वायंगणी बीच ऑलिव्ह रिडले कासवांसाठी घरटे बांधण्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.