Kolhapur Tourism : धुक्यात हरवलेले कोल्हापूरचं सुंदर ठिकाण, 'येथे' रोमांचक घाटाचा एकदा अनुभव घ्याच

Shreya Maskar

कोल्हापूर

कोल्हापूरपासून ५५ किमी अंतरावर, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेले गगनबावडा हे एक अतिशय नयनरम्य आणि शांत हिल स्टेशन आहे.

hill station | google

सुंदर निसर्ग

गगनबावडा हे ठिकाण दाट जंगल, पावसाळ्यातील धबधबे, ऐतिहासिक गगनगड किल्ला, करूळ आणि भुईबावडा घाटांच्या विहंगम दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.

hill station | google

पर्यटन स्थळे

गगनबावडा येथे गगनगिरी महाराजांचा मठ, पांडव गुहा आणि लक्ष्मपूर धरण ही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. येथे फॅमिलीसोबत फिरायला नक्की जा.

hill station | google

ट्रेकिंग

गगनबावडा हे ठिकाण पावसाळ्यात हिरव्यागार निसर्गाने नटलेले असून पर्यकांना उत्तम ट्रेकिंगचा अनुभव देते. निसर्गाच्या सानिध्यात येथे सुंदर फोटोशूट करता येते.

Trekking | yandex

इतर नावे

गगनबावडा हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या ठिकाणांपैकी एक असल्यामुळे त्याला 'महाराष्ट्राचे चेरापुंजी' किंवा 'मिनी महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाते.

hill station | google

धबधबा

पावसाळ्यात कोल्हापूरजवळील गगनबावडा-राधानगरी मार्गावरील राऊतवाडी धबधबा निसर्ग सौंदर्याने बहरून दुथडी भरून वाहतो, ज्यामुळे तो एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट बनला आहे.

waterfall | google

कोल्हापूर पर्यटन स्थळे

कोल्हापूरला गेल्यावर अंबाबाई मंदिर, रंकाळा तलाव, न्यू पॅलेस, जोतिबा मंदिर, दाजीपूर अभयारण्य आणि पन्हाळा किल्ला ही पर्यटन स्थळे आहेत.

hill station | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

hill station | google

NEXT : सातपुडा पर्वतरांगेतील एक अद्भुत ट्रेकिंग स्पॉट, साहसप्रेमींसाठी परफेक्ट लोकेशन

Buldhana Tourism | google
येथे क्लिक करा...