Shreya Maskar
तुम्ही कुटुंबासोबत बुलढाण्याला गेला असाल तर तेथील निसर्गरम्य ठिकाणे नक्की पाहायला जा. येथे मैलगड नावाचे एक ऐतिहासिक ठिकाण आहे.
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात, सातपुडा पर्वतरांगेत मैलगड हा ऐतिहासिक गिरीदुर्ग वसलेला आहे.
रायपूर गावाच्या जवळ असलेला मैलगड किल्ला अचलपूरच्या नवाबाने १७५७ च्या सुमारास बांधला, ज्याचा वापर सातपुडा घाट मार्गाच्या रक्षणासाठी केला जात असे.
मैलगड किल्ल्यावर भक्कम बुरुज, खांबटाकी, लेण्या आणि दगडात कोरलेली गडाची प्रतिकृती (नकाशा) पाहायला मिळते.
समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० ते ९०० मीटर (सुमारे २६००-३००० फूट) उंचीवर वसलेला असावा. मैलगड किल्ला घनदाट जंगलाने वेढलेला आहे.
बुलढाणा जिल्हा हा ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असून, लोणार सरोवर, गजानन महाराज मंदिर ही प्रमुख पर्यटन आकर्षणे आहेत. हे ठिकाण निसर्गप्रेमी, इतिहासप्रेमी आणि भाविकांसाठी एक उत्तम डेस्टिनेशन आहे.
तुम्ही किल्ल्यावर जाऊन सुंदर फोटो काढू शकता. येथील सौंदर्य कायम तुमच्या मनात घर करून राहील.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.