Vasai Tourism : शहराच्या गोंधळापासून दूर वसलंय 'हे' ठिकाण, येथील सौंदर्य पाहताच मन होईल फ्रेश

Shreya Maskar

वसई

पालघर जिल्ह्यातील वसई येथील भुईगाव बीच हा स्वच्छ वाळू, शांत पाणी आणि गर्दीपासून दूर असलेल्या निसर्गरम्य वातावरणासाठी एक उत्तम ठिकाण आहे.

Beach | google

भुईगाव बीच

रानगाव बीचच्या जवळ असलेला भुईगाव बीच किनारा नारळाच्या झाडांनी वेढलेला असून, सूर्यास्त पाहण्यासाठी आणि विकेंडला कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी पर्यटकांना पसंतीस पडतो.

Beach | google

घोडेस्वारी

वसईतील भुईगाव बीच येथे घोडेस्वारीची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे लहान मुलांना घेऊन येथे नक्की जा. भुईगाव बीचला गेल्यावर तुम्ही बोटिंगचा देखील आनंद घेऊ शकता.

Beach | google

निसर्ग सौंदर्य

भुईगाव बीच मऊ वाळू पाहायला मिळते. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात प्री-वेडिंग शूट देखील करू शकता. त्यामुळे हे मुंबईजवळील स्वर्ग म्हणायला काही हरकत नाही.

Beach | google

कसं जावे?

वसई रोड किंवा नालासोपारा स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षा किंवा बसने भुईगावला पोहोचू शकता. तेथून तुम्ही भुईगाव बीचला लवकर जाल.

Beach | google

पर्यटन स्थळे

भुईगाव बीचसोबतच वसई येथे अर्नाळा बीच, तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य, चिंचोटी धबधबा आणि वज्रेश्वरी गरम पाण्याचे झरे आहेत.

Beach | google

कधी भेट द्याल?

भुईगाव बीचला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भेट द्या. कारण येथे हिरवागार निसर्ग बहरतो. तसेच थंड हवेचे वारे आपल्या मनाला स्पर्श करतात.

Beach | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Beach | google

NEXT :  भारतातील ऐतिहासिक रत्न; वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना, 'येथे' पाहाल इतिहास, सौंदर्य अन् संस्कृतीचा संगम

India Tourism | yandex
येथे क्लकि करा...