Shreya Maskar
दिल्लीतील लाल किल्ला हे मुघल सम्राट शाहजहानने १६३८-१६४८ दरम्यान बांधलेले युनेस्को जागतिक वारसा स्थळ असून ते भारताच्या स्वातंत्र्य आणि इतिहासाचे प्रमुख प्रतीक आहे.
लाल वाळूच्या दगडांनी बनलेला लाल किल्ला त्याच्या भव्य वास्तुकला, दिवाण-ए-आम, दिवाण-ए-खास आणि लाहोर गेटसाठी प्रसिद्ध आहे.
दीवान-ए-आम दालनातून मुघल बादशहा सामान्य जनतेला भेटत होता. हे भव्य दालन आहे. दीवान-ए-खास हे राजवाड्याचे अंतर्गत दालन आहे, जिथे खास लोकांसाठी सभा घेतल्या जात असते.
दिल्लीतील लाल किल्ल्याच्या आत औरंगजेबाने १६५९-१६६० च्या दरम्यान बांधलेली 'मोती मशीद' ही एक लहान, पांढऱ्या संगमरवरातील अत्यंत सुंदर मशीद आहे.
दिल्लीतील लाल किल्ल्याच्या आत 'क्रांती मंदिर' या नावाने ओळखला जाणारा एक संग्रहालय संकुल आहे, ज्यामध्ये स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित अनेक संग्रहालये आहेत.
लाल किल्ल्यावर 'जय हिंद' नावाने भव्य लाईट अँड साऊंड शो आयोजित केला जातो. हे प्रदर्शन १७ व्या शतकापासून ते आजपर्यंतचा भारताचा इतिहास, स्वातंत्र्यलढा आणि मुघल काळातील घटना प्रकाश, ध्वनी, नाटके, नृत्य आणि पपेट शोच्या माध्यमातून मांडते.
लाहोर गेट हे दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. लाल किल्ला मुघल साम्राज्याचे प्रतीक आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.