Nagpur Tourism : नागपूरमधील सुंदर ट्रिप लोकेशन, सुट्टीत पाहा हिरव्यागार डोंगरांनी वेढलेले 'हे' ठिकाण

Shreya Maskar

खिंडसी तलाव

खिंडसी तलाव हे नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरात वसलेले आहे. खिंडसी तलाव हे नौकाविहारासाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही येथे बोटिंगचा भन्नाट आनंद घेऊ शकता.

Lake | google

घनदाट जंगल

खिंडसी तलाव हा नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ वसलेला एक नयनरम्य आणि मोठा कृत्रिम तलाव आहे. येथे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करू शकता.

Lake | google

जंगल ट्रेकिंग

खिंडसी तलाव हा सुर आणि कपिला या नद्यांवर धरण बांधून तयार करण्यात आला आहे. खिंडसी तलाव जंगल ट्रेकिंगसाठी बेस्ट आहे.

Lake | google

जलक्रीडा

खिंडसी तलाव वॉटर स्पोर्ट्सद्वारे विविध प्रकारच्या बोटिंग सुविधा उपलब्ध आहेत. येथे मोटरबोट्स, पेडल बोट्स, रोइंग बोट्स आणि वॉटर स्कूटरचा थरार अनुभवता येतो.

Lake | google

रेस्टॉरंट

खिंडसी तलावा येथे राहण्यासाठी उत्तम रिसॉर्ट्स, थरारक अ‍ॅडव्हेंचर पार्क आणि स्वादिष्ट भोजनाची सोय उपलब्ध आहे. शेतीच्या सिंचनासाठी आणि पर्यटनासाठी हे अत्यंत महत्त्वाचे केंद्र मानले जाते.

Lake | google

तलावाची निर्मिती

नागपूरचे राजे मुधोजी दुसरा भोसले यांनी १८४० मध्ये रामटेकजवळील सुर आणि कपिला नद्यांवर धरण बांधून खिंडसी तलावाची निर्मिती केली होती.

Lake | google

पक्षी निरीक्षण

हिवाळ्यात अनेक स्थलांतरित आणि स्थानिक पक्षी बघायला मिळतात. हे निसर्गप्रेमी आणि पक्षी निरीक्षकांसाठी एक प्रमुख आकर्षण केंद्र आहे.

Lake | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Lake | google

NEXT : हिरव्यागार निसर्गाने नटलेले 'मुळशी'; वीकेंडला करा पुण्याचा प्लान, 'ही' २ ठिकाणे पाहायला विसरू नका

Pune Tourism | saam tv
येथे क्लिक करा...