Pune Tourism : हिरव्यागार निसर्गाने नटलेले 'मुळशी'; वीकेंडला करा पुण्याचा प्लान, 'ही' २ ठिकाणे पाहायला विसरू नका

Shreya Maskar

पुणे

पुण्याजवळील मुळशी येथे मुळशी धरण आणि ताम्हिणी घाट ही स्वर्गाहून सुंदर ठिकाणे आहेत. वीकेंडला येथे नक्की फिरायला जा.

pune | google

मुळशी धरण

मुळशी धरण हे निसर्गसौंदर्य, हिरवेगार सह्याद्रीचे डोंगर आणि शांत वातावरणामुळे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथील धबधबे, बोटिंग आणि कॅम्पिंग विशेष आकर्षण असते.

Mulshi | google

ताम्हिणी घाट

ताम्हिणी घाट हा पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगडमधील माणगावला जोडणारा निसर्गरम्य घाटरस्ता आहे, जो विशेषतः मान्सूनमध्ये हिरवीगार डोंगररांगा, धबधबे, दाट धुके आणि मुळशी धरण च्या बॅकवॉटरसाठी प्रसिद्ध आहे.

Mulshi | google

निसर्ग सौंदर्य

मुळशी धरण फोटोग्राफी, पक्षी निरीक्षणासाठी उत्तम ठिकाण आहे. ताम्हिणी घाट पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे.

Mulshi | google

किल्ले

मुळशी तालुक्यात कोराईगड आणि घनगड हे ऐतिहासिक किल्ले आहेत. हे दोन्ही किल्ले ट्रेकिंगसाठी लोकप्रिय आहेत. तुम्ही येथे वन डे ट्रिप प्लान करू शकता.

Mulshi | google

बोटींग

मुळशी धरण हे बोटींग, कायकिंग आणि जेट स्कीइंगसारख्या जलक्रीडांसाठी उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्हाला निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Mulshi | google

सोयी-सुविधा

मुळशी धरणाच्या आजूबाजूला राहण्यासाठी अनेक लक्झरी रिसॉर्ट्स, इको-फ्रेंडली कॉटेजेस आणि होमस्टे उपलब्ध आहेत. तसेच स्थानिक हॉटेल्समध्ये महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घेऊ शकता.

Mulshi | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Mulshi Dam | google

NEXT : मराठवाड्यात लपलाय वास्तुकलेचा सुंदर नजारा, वाचा 'या' किल्ल्याचा वैभवशाली इतिहास

Latur Tourism | google
येथे क्लिक करा...