Latur Tourism : मराठवाड्यात लपलाय वास्तुकलेचा सुंदर नजारा, वाचा 'या' किल्ल्याचा वैभवशाली इतिहास

Shreya Maskar

लातूर

लातूर जिल्ह्यातील औसा भुईकोट किल्ला वसलेला आहे. १४६६ मध्ये बहामनी वजीर महमूद गवानने लातूर जिल्ह्यातील औसा भुईकोट किल्ला बांधला.

Fort | google

औसा किल्ला

औसा किल्ला जमिनीच्या पातळीपेक्षा खाली ‌असल्याने जवळ गेल्याशिवाय दिसत नाही. त्यामुळे सैन्याला लपवण्यासाठी ही जागा उपयुक्त ठरली.

Fort | google

युरोपीय शैली

औसा किल्ल्यावर तुर्की आणि युरोपीय शैलीचा प्रभाव आहे. औसा किल्ल्यात लोखंडी दरवाजा, राणी महाल आणि पाण्याचे टाके आहेत.

Fort | google

बांधकाम

औसा किल्ला हा त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधकामासाठी ओळखला जातो. ज्यामध्ये तुर्की आणि युरोपीय स्थापत्यशैलीचा स्पष्ट प्रभाव दिसतो. वास्तुकलेचा येथे सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Fort | google

ऐतिहासिक वास्तू

औसा किल्ल्यामध्ये 'लोखंडी दरवाजा', 'राणी महाल', 'लाल महाल', 'पाणी महाल', आणि 'परी बावडी' यांसारख्या अनेक ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात.

Fort | google

इंग्रजांची सत्ता

औसा किल्ल्यावर बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मुघल आणि नंतर इंग्रजांची सत्ता होती. त्यामुळे हा महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे.

Fort | google

कधी जावे?

औसा किल्ल्याला हिवाळ्यात भेट द्या. औसा किल्ला ट्रेकिंगसाठी बेस्ट आहे. तुम्ही पहिल्यांदाच ट्रेकिंगचा प्लान करत असाल तर औसा किल्ला भेट द्या.

Fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

trekking | google

NEXT : 'व्हॅलेंटाईन डे' ला जोडीदाराला द्या खास सरप्राइज, पुण्याजवळील 'या' ठिकाणी प्लान करा रोमँटिक ट्रिप

Pune Tourism | yandex
येथे क्लिक करा...