gold rate saam tv
बिझनेस

Gold Price Today : अबब! सोन्याला लाखाची झळाळी; 3 महिन्यांत एक लाखांच्या पार, कारण काय? पाहा स्पेशल रिपोर्ट

Gold rate today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याने मोठी उसळी मारलीये आणि आजतर ऐतिहासिक उच्चांकच गाठलाय. सध्या सोनं खरेदी करण्यासंदर्भात तज्ञांचं म्हणण काय आहे? भविष्यातील गुंतवणुकीसाठी सोनं उत्तम पर्याय आहे का? पाहूयात, या स्पेशल रिपोर्टमधून

Tanmay Tillu

सोना कितना सोना है...याचं उत्तर 10 ग्रॅम साठी फक्त 1 लाख रुपये... अर्थात लग्नसराईत सोनं खरेदी करणारे आणि तसेच गुंतवणूक म्हणूनही सोन्याची खरेदी करणाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी ही बातमी. गेल्या काही दिवसांत सतत वाढणाऱ्या सोन्याच्या दराने 1 लाखांचा टप्पा पार केलाय.. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांचा खिसा आणखी रिकामा होणार आहे. सोन्याचे दर 1 लाख 1 हजार 400 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचलाय..साहजिकचं सर्वसामान्यांना सोनं एवढं भाव का खातंय असा प्रश्न पडलाय..त्याचीच उत्तर जाणून घेऊ...

सोनं भाव का खातंय? -

- चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्ध

- जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेचा परिणाम, मंदीची भीती

- सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याच्या गुंतवणुकीकडे कल

- अधिक परताव्यासाठी सोनं खरेदीचा गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला

- मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात उसळी

तर भविष्यातील गुंतवणूकीसाठी सोनंच उत्तम पर्याय असल्याचा सल्ला तज्ञांनी दिलायं...

देशातंर्गत बाजारात सोनं नव्या उच्चांकावर आहे. या वर्षात शेअर बाजारात चढ उतार दिसून आला. त्याचवेळी सोनं बाजारानं नवे विक्रम केले. सोनं आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडत लाखाच्या पार पोहचलंय.. त्यामुळे गुंतवणुकदारांना सोन्यातून सोन्यासारखा परतावा मिळालाय. तर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर सोनं खरेदी गेलीये. सोनं आणखी भाव खाणार की पुन्हा घसरणार हेच पाहायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया

Gold Rate: धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत सोनं स्वस्त; ३००० रुपयांची घसरण, ग्राहकांची गर्दीच गर्दी

Bigg Boss 19 : बापाने केली लेकाची कानउघाडणी; सलमान खानने अमाल मलिकला दिली शेवटीची वॉर्निंग, पाहा VIDEO

Kurkurit Chakali: कुरकुरीत चकली कशी बनवायची?

धारदार हत्याराने तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कापला अन्...; रक्ताच्या थारोळ्यात पडला, सशंय कुणावर?

SCROLL FOR NEXT