Gold Price Hike
Gold Price HikeSaam Tv

Gold Price Hike: सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला, एक लाखांचा टप्पा ओलांडला, वाचा आजचे दर

Gold Price Hike Upto 1 Lakh: सोन्याचे दर आज गगनाला भिडले आहेत. सोन्याचे दर आता १ लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. यामुळे ऐन सणासुदीच्या दिवशी खरेदीदारांच्या खिशाला फटका बसणार आहे.
Published on

सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत (Gold Price Hike). सोन्याच्या दरांनी १ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसात सोन्याच्या किंमतीने उच्चांक गाठल्याने खरेदीदारांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करायचे की नाही असा प्रश्न पडला आहे.

Gold Price Hike
Success Story: हेलिकॉप्टर, फायटर जेट बघायचे..., अखेर ते स्वप्न सत्यात उतरलं, NDA च्या परीक्षेत देशात पहिली आलेला ऋतुजा वऱ्हाडेची यशोगाथा

१ तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार लाखो रुपये (Gold Price Upto 1 Lakh)

सोन्याच्या किंमतीत भरघोस वाढ झाली आहे. गुडरिटर्न्सनुसार, सध्या २४ कॅरेट सोन्याची किंमत ९७५८० रुपये झाली आहे. यावर जीएसटी लागणार आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती १ लाख १ हजारांवर पोहचल्या आहेत. एप्रिल महिन्यात अक्षय तृतीया आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एका मूहूर्तावर अनेक लोक सोनं खरेदी करतात. परंतु सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाल्याने सोनं खरेदी करायचा की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सोन्याचे भाव (Gold Rate Today)

२२ कॅरेट (22k Gold Price)

सध्या १ ग्रॅम सोने ९,०१५ रुपयांना विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७२,१२० रुपये आहे. १ तोळा सोन्याची किंमत ९०,१५० रुपये आहे. आज २२ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ७०० रुपयांनी वाढ झाली आहे.

२४ कॅरेट सोन्याची किंमत (24k Gold Price)

१ ग्रॅम सोन्याची किंमत ९,८३५ रुपये आहे. ८ ग्रॅम सोने ७८,६८० रुपयांना विकले जात आहे. १ तोळा सोन्याची किंमत ९८,३५० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ७७० रुपयांनी वाढ झाली आहे.

Gold Price Hike
EPFO 3.0 Update: आता ATM मधून काही सेकंदात काढता येणार PF; या तारखेपासून सुरु होणार प्रोसेस; जाणून घ्या सविस्तर

१८ कॅरेट सोन्याची किंमत

८ ग्रॅम सोन्याची किंमत ५९००८ रुपये आहे.१ तोळा सोन्याची किंमत ७३,७६० रुपये आहे. या किंमतीत ५७० रुपयांनी वाढ झाली आहे.

चांदीची किंमत (Silver Price)

आज चांदीच्या किंमती स्थिरावल्या आहेत. १० ग्रॅम चांदी १,०१० रुपयांना विकली जात आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत १०,१०० रुपये आहे. चांदीच्या किंमतीत १०० रुपयांनी वाढ झाली आहे.चांदीचे दर जीएसटी सहित १ लाख ५०० रुपयांवर पोहोचले आहेत. दुपारी बारावाजेनंतर सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊन सोन्याचे दर एक लाखांवर पोचतील, अशी माहिती सुवर्ण व्यवसायिकांनी दिली आहे.

सोन्याचे दर एक लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचले असून सोने खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेलं नाही. अशा ग्राहकांच्या प्रतिक्रिया आहेत

Gold Price Hike
Gold-Silver Price Hike: सोनं-चांदीला पुन्हा लखाखी! ६ दिवसांत सोन्याच्या दरात २१०० रुपयांची वाढ, चांदीही महागली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com