Saam Tv
मोठ्या गाड्यांमधून फिरण्याचे योग आहेत. नियोजित केलेली कामे यशस्वी होतील. बढतीचे योग आहेत.
देवी उपासना आज फलदायी ठरेल. नातवंडांचे सौख्या अपार मिळेल. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे. यशाची चाहूल लागेल.
अडचणी असल्या तरी वाट काढावी लागते, हे समजेल. ओळखीने कामे होतील. मात्र वाम मार्गाने कामे नकोत. दिवस संमिश्र आहे.
प्रेमामधील आतुरता वाढेल. संसारामध्ये एकमेकांच्या साथीने पुढे जाल. दिवस चांगला आहे.
पाठीच्या मणक्याचे, हृदयाशी निगडित त्रास संभवत आहेत. विनाकारण अपमानही सहन करावे लागतील. आजचा दिवस अॅड्जस्ट करून घेण्याचा आहे.
विष्णू उपासना फलदायी ठरेल. धनयोगाला, शेअर्स साठी, लॉटरीमध्ये पैसे मिळण्यासाठी दिवस चांगला आहे. वक्तृत्वाने करिअर बहरेल.
घरामध्ये दाग - दागिने साठी, नव्या काही गोष्टी खरेदी करण्यासाठी पैसे खर्च होतील. वाहन आणि गृह दोन्हीसाठी पुढाकार घेऊन कामे कराल.
भावंडांचे प्रेम मिळेल. स्वतःवर तुम्हाला भले शाब्बास असे म्हणावेसे वाटेल. अडचणीतून वाट काढत आज यशाचे टोक गाठाल .
कुटुंबासोबत चांगला संवाद घडेल. गुंतवणुकीसाठी, धन आवक जावक, पैशाच्या व्यवहारासाठी दिवस चांगला आहे.
नेटाने आणि एकट्याने काम कराल. आरोग्यदायी घटना घडतील. नैराश्य गळून पडेल.
परदेश गमनाची निगडित निर्णय होतील. काही गोष्टींसाठी पैशाची व्यवस्था करावी लागेल. दिवस धावपळीचा असेल जवळच्या लोकांकडून नाहक मनस्ताप होईल.
मैत्रीमध्ये प्रेम वृद्धिंगत होईल. शेजारी सौहार्दाने वागतील. अनंत अडचणी पार करून इथवर पोहोचला आहात, आज त्याचे लाभ नक्की मिळणार आहेत. दिवस चांगला आहे.