Saam Tv
नाचणी डोसा हा मुलांच्या नाश्त्यासाठीचा एक उत्तम पदार्थ आहे. (healthy breakfast recipes)
नाचणीचे पीठ, तांदळाचे पीठ, दही, पाणी, जिरे, हिंग, मीठ, कांदा, कोथिंबीर, तेल
एका भांड्यात तांदळाचं आणि नाचणीचं पीठ घ्या.
त्यामध्ये दही, जिरं, हिंग, मीठ, कांदा, कोथिंबीर आणि पाणी घालून डोशासारखे बॅटर तयार करून झाकून ठेवा.
१५ मिनिटांनी पीठ चांगल फुलेल. आता एक तवा गरम करून त्यावर तेल पसरवा. पातळ बॅटरमुळे कुरकुरीत डोसा होतो.
आता बॅटर एका पळीने घेऊन गोलसर पातळ पसरवा. वरून थोडंस तेल सोडून झाकन ठेवा.
डोसा एक बाजूने कुरकुरीत झाला की पलटून दुसरी बाजूही थोडी भाजून घ्या.
तुम्ही हा डोसा मुलांना नारळाची चटणी किंवा सांबारसोबत खायला देऊ शकता.