Saam Tv
उन्हाळ्यामध्ये लहान मुलं दिवस भर घरात खेळत असतात.
लहान मुलं जेवण कमी पण विकतचे चॉकलेट्स खाणं जास्त पसंत करतात.
अशा वेळेस तुम्ही एकदम कमी वेळात आणि कमी साहित्यात चॉकलेट केक तयार करू शकता.
१ कप बारिक केलेले चॉकलेट, १ कप बटर, १ कप साखर, अर्धी वाटी मैदा, २ अंडी.
एका वाटीत मैदा घ्या. त्यामध्ये अंडी फोडा.
आता मेल्ट केलेलं बटर आणि साखर घालून चांगलं फेटून घ्या.
आता एका ओव्हनमध्ये किंवा कुकरमध्ये प्रीहीट करून घ्या. आणि केकच्या भांड्याला बटर लावून त्यामध्ये बॅटर ओता.
आता हे भांड कुकर किंवा ओव्हनमध्ये ठेवा. २० ते २५ मिनिटांनी केक सुकलाय का? हे तपासा.
केक सुकल्यावर तुम्ही मेल्ट केलेले चॉकलेट घालून लहान मुलांना सर्व्ह करा.