
नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट हे असते. हे अकाउंट ईपीएफओद्वारे सुरु केले जाते. आता ईपीएफओमध्ये मोठा अपडेट होणार आहे. ईपीएफओ ३.० व्हर्जन सुरु केले जाणार आहे. यामुळे तुम्हाला पीएफ एटीएम आणि यूपीआयद्वारे काढता येणार आहे.
केंद्रिय मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत माहिती दिली आहे. ईपीएफओने कोट्यवधी कर्मचाऱ्यांना उत्तम सुविधा देण्यासाठी डिजिटल बदल केले आहेत. हे ईपीएफओ ३.० व्हर्जन मे किंवा जून महिन्यापासून सुरु होणार आहे. म्हणजे अवघ्या काही दिवसांतच तुम्हाला पीएफचे पैसे एटीएमद्वारे काढता येणार आहेत.
सुविधा
मनसुख मांडविया यांनी सांगितले की, ईपीएफओ लाभार्थ्यांना ३.० व्हर्जनमुळे पीएफ सेटलमेंट लवकर होणार आहे तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकणार आहात. त्यांनी सांगितले की,ऑटोमॅटिक क्लेम, डिजिटल सर्व्हिस आणि एटीएमद्वारे फंड काढण्याच्या सर्व्हिस प्रोवाइड केल्या जाण्यात आहे. ईपीएफओची (EPFO) प्रक्रिया अधिक सुलभ करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
नवीन व्हर्जनमुळे आता पीएफच्या दाव्यांसाठी तुम्हाला ईपीएफओ कार्यालयात जाण्याची गरद नाही. तुम्ही घरबसल्या ओटीपी टाकून ईपीएफओ खाते अपडेट करु शकतात. पेन्शन काढण्यासाठी रिक्वेस्ट करु शकतात.
मनसुख मांडविया यांनी सांगितले की, सध्या सरकारच्या गॅरंटीसहित २७ लाख कोटी रुपयांचा फंड आहे. सरकार सध्या पीएफवर (PF Interest Rate) ८.२५ टक्के व्याज देते. यामध्ये ७८ लाखांपेक्षा जास्त पेन्शनधारक आहे. आता त्यांना देशातील कोणत्याही खात्यातून पेन्शन (Pension) काढता येणार आहे.
एटीएममधून पीएफचे पैसे कसे काढायचे?
आता कर्मचाऱ्यांना लवकरच एटीएममधून पीएफ काढता येणार आहे. तुम्ही जसे इतर खात्यातील पैसे काढतात तसेच एटीएममधून काढू शकणार आहात. यासाठी १ लाख रुपयांची लिमिट असणार आहे. यासाठी तुम्हाला डिजिटल एटीएम कार्ड दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मे किंवा जून महिन्यात ही प्रक्रिया सुरु होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.