कॅन्सल चेक अन् व्हेरिफिकेशनची झंझट संपली; आता PF साठी ऑनलाइन क्लेम करणे होणार आणखी सोपं; EPFOची मोठी घोषणा

EPFO New Update: ८ कोटी EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पीएफसाठी ऑनलाइन क्लेम करताना तुम्हाला कॅन्सल चेक जमा करण्याची गरज भासणार नाही.
EPFO
EPFO Saam Tv
Published On

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ईपीएफओने पीएफच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यामुळे आता पीएफ काढणे अधिक सोपे होणार आहे. याआधी पीएफमधून ऑनलाइन पैसे काढण्यासाठी तुम्हाला कॅन्सल केलेला चेक जमा करावा लागायचा. आता तुम्हाला पीएफमधून जलद गतीने पैसे काढता येणार आहे. याआधी कॅन्सल चेक सबमिट करावा लागायचा. त्यानंतर तुम्हाला पैसे काढता येत होते. मात्र, आता हे सर्व प्रक्रिया बंद करण्यात आली आहे.

EPFO
Rule Change: EPFO ते LPG गॅसच्या किंमती; आजपासून या नियमांमध्ये मोठे बदल; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

ईपीएफओने (EPFO) अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे आता बँक खाते आणि यूएएन नंबर लिंक करण्यासाठी आता नियोक्त्याकडून परवानगी घेण्याचीचीही गरज पडणार आहे. तुमचे बँक अकाउंट आणि यूएएन आपोआप लिंक होईल. ईपीएफओच्या या निर्णयामुळे कॅन्सल चेक किंवा व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्णपणे रद्द केली आहे. या नवीन नियमांचा फायदा ८ कोटी ईपीएफओ सदस्यांना होणार आहे.

कोणत्या नियमांत बदल

सध्या ईपीएफओच्या सदस्यांना पीएफ खात्यातून पैसे काढताना यूएएन नंबर ज्या पीएफ खात्याशी जोडला आहे त्याच्या पासबुकची प्रत अपलोड करणे आवश्यक होती. तसेच नियोक्त्यांनाही बँक खात्याच्या माहितीला परवानगी देणे गरजेचे होते. परंतु आता ही सर्व प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. यामुळे पीएफसाठी ऑनलाइन क्लेमची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे.

EPFO
EPFO Recruitment: EPFO मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

कामगार मंत्रालयाचा निर्णय

कामगार मंत्रालयाने याबाबत निवेदन जारी केली आहे. यामध्ये आता कॅन्सस चेक आणि पासबुकचा फोटो अपलोड करण्याची प्रक्रिया काढून टाकण्यात आली आहे. यामुळे पीएफ सदस्यांसाठी जीवन सुलभता आणि नियोक्त्यांसाठी व्यवसाय सुलभता करण्यासाठी या दोन अटी रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे पीएफ क्लेमच्या प्रक्रियेत चांगली सुधारणा होईल, दावे नाकारण्याच्या तक्रारी कमी होतील, असं निवेदनात म्हटलं आहे.

EPFO
EPFO चा मोठा निर्णय! कोणत्याही कागदपत्रांशिवाय काढता येणार PF चे ५ लाख रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com