EPFO चा मोठा निर्णय! आता घरबसल्या UAN नंबर करा अ‍ॅक्टिव्हेट; जाणून घ्या सिंपल प्रोसेस

UAN Number Activation Online Process: ईपीएफओने कर्मचाऱ्यांसाठी नवीन सुविधा लाँच केली आहे. आता तुम्ही घरबसल्या यूएएन नंबर अॅक्टिव्हेट करु शकणार आहात.
EPFO
EPFO Saam Tv
Published On

संघटित क्षेत्रात काम करणारे कर्मचारी ईपीएफओचे सदस्य असतात. ईपीएफओद्वारे कर्मचाऱ्यांचा पीएफ जमा केला जातो. यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचा वेगवेगळा यूएएन नंबर दिला जातो. हा नंबर ईपीएफओ अकाउंटशी लिंक असतो. आता तुम्ही हा युनिव्हर्सल प्रोव्हिडंट फंड अकाउंट नंबर घरबसल्या बनवू शकतात.

EPFO
आता काही सेकंदातच काढता येणार PF चे पैसे, EPFO 3.0 नक्की आहे तरी काय?

आतापर्यंत कर्मचारी ज्या संस्थेत काम करतात त्या कर्मचाऱ्याला यूएएन नंबर एचआर डिपार्टमेंट करतो. परंतु आता हे काम तुम्ही काही क्लिकवर करु शकणार आहात. तुम्ही घरबसल्या अॅपवरच हे काम करु शकतात. यासाठी तुम्हाला एचआर डिपार्टमेंटवर अवलंबून राहण्याची गरज नाही.

कामगार व रोजगार मंत्रालयाच्या मते, आधार कार्डची पडताळणी करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणी नावे, आडनाव, जन्मतारीख यामध्ये चुका आहेत. त्यामुळे दावा करताना या चुका सुधारुन घ्याव्या लागतात. २०२४-२५ मध्ये १.२६ कोटी यूएएन नंबरपैकी फक्त ४४.६८ लाख सदस्यांनी सक्रिय केले आहे.

सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा

याचा वापर कर्मचारी आणि मालक असे दोघेही करु शकतात. हे आधार आणि फेस ऑथेंटिकेशनसाठी वापरला जाईल. यामध्ये युजर्सचा डेटा हा थेट आधारमधून भरला जातो. ईपीएफओच्या मते, युजर्सचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक असलेल्या नंबरशी मॅच केला जातो. यानंतर ईपीएफओ पोर्टलवर यूएएन (UAN Activation) अॅक्टिव्हेशन पूर्ण केले जाईल.

EPFO
PF Calculation: PF खात्यात किती पैसे जमा होतात? निवृत्तीनंतर किती मिळणार पेन्शन; कॅल्क्युलेशन वाचा

नियोक्त्यांना आधार ओटीपी वापरुन यूएएन सक्रिय करायला लागतो. यामुळे भविष्यातील फायदे डीबीटीद्वारे कर्मचाऱ्यांना दिले जातील. अनेक प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्याला त्याचा यूएएन नंबरच माहित नसतो. अनेकदा नंबर बदलणे किंवा चुकीचा असणे यामुळे अनेक अडचणी येतात. यामुळे आता ईपीएफओ पोर्टलवर जाऊन काही मिनिटांत तुम्ही तुमचा यूएएन नंबर अॅक्टिव्हेट करु शकणार आहात.

EPFO
EPFO चा मोठा निर्णय! ऑटो क्लेम सेटलमेंटची मर्यादा ते पीएफ ट्रान्सफरच्या या ५ नियमांत मोठा बदल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com