सावधान, ChatGPT आहे धोक्याचं! ChatGPTच्या मदतीने बनतायेत बनावट आधार, पॅन कार्ड, कसं ओळखाल खरं कार्ड

ChatGPT Fake Aadhaar PAN Card: एआयचा गैरवापर करून बनावट आधार आणि पॅन कार्ड तयार केले जात आहेत. खऱ्या आणि बनावट कागदपत्रांमधील फरक कसा ओळखायचा ते जाणून घेऊया?
fake Aadhaar PAN Card
ChatGPT Fake Aadhaar PAN CardSaam Tv
Published On

तंत्रज्ञानाच्या जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स विशेष भूमिका आहे. अनेक लोक एआयचा अवलंब करून कामे पूर्ण करत आहेत. पण यातून अनेक फसवणूक करत असल्याची बाब समोर आलीय. AI वापरण्यासाठी बहुतेक लोक OpenAI चे ChatGPT वापरत आहेत. या आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉटच्या माध्यमातून लोक त्यांचा फोटो घिबली इमेज किंवा इतर स्टाइलमधील फोटो बनवत आहेत. सोशल मीडियावर हे फोटो खूप केली जात आहेत.

बनावट आधार-पॅन कार्ड

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या चॅटबॉट चॅटजीपीटीच्या माध्यमातून बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड बनवले जात असल्याचा दावा केला जातोय. AI सह बनावट भारतीय ओळख दस्तऐवज तयार करण्याचा दावाही केल्यानंतर जेव्हा Moneycontrol.com ने Mac ॲपवर आधार प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ChatGPT ने ते तयार करण्यास नकार दिला. आधार कार्ड सारखे अधिकृत दस्तऐवज तयार करण्यास किंवा त्यात बदल करण्यास सिस्टीमने नकार दिला.

fake Aadhaar PAN Card
Post Office Scheme: पोस्टाची भन्नाट योजना, फक्त व्याजातून कमवा २ लाख रुपये; मिळतोय जबरदस्त रिटर्न

तसेच आधार कार्ड बनवण्यासाठी अधिकृत UIDAI वेबसाइट किंवा जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट देण्याचा सल्ला चॅटजीपीटीच्या सिस्टीमने दिला. मात्र, त्यामुळे बनावट कार्ड बनवण्याच्या दाव्यावर पडदा पडला असं नाही. पण सिस्टीमने आधारकार्ड बनवण्यास नकार दिला असला तरी, त्यात काहीतही गौडबंगाल असू शकते, त्यामुळे आपली कागदपत्रे सुरक्षित ठेवणे महत्त्वाचं आहे.

fake Aadhaar PAN Card
Mutual Funds: घरबसल्या म्युच्युअल फंड KYC कशी पूर्ण कराल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप जाणून घ्या

या चुका करू नका

तुमची कागदपत्रे कोणाशीही शेअर करू नका.

विचारपूर्वक लिंकवर क्लिक करा.

कोणत्याही थर्ड पार्टी ॲपला फोटो गॅलरीत प्रवेश देऊ नका.

खरं आधार, पॅन कार्ड कसं ओळखायचं?

बनावट पासपोर्ट, आधार, पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रे AI द्वारे तयार केलेली खरी आहेत की बनावट हे ओळखण्यासाठी, दोघांमधील फरक ओळखण्यास शिका. सर्वात आधी दस्तऐवजात योग्य फॉन्टसह हिंदी किंवा इंग्रजीमध्ये तपशील आहे का नाही हे काळजीपूर्वक तपासा. यानंतर दस्तऐवजाचे फोटो पहा. बारकाईने पाहून तुम्ही खऱ्या आणि बनावट कागदपत्रांमध्ये फरक करू शकता. इतर कोणाचे दस्तऐवज स्वतःकडे सबमिट करता तेव्हाही ते काळजीपूर्वक तपासून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com