WhatsApp Saam Tv
बिझनेस

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फीचर! आता स्क्रिन शेअर करता येणार; कसं वापरायचं?

WhatsApp Screen Share Feature: व्हॉट्सअॅपने नवीन फीचर लाँच केलं आहे. आता तुम्हाला व्हॉट्सअॅपवरुन स्क्रिन शेअर करता येणार आहे. हे फीचर कसं वापरायचं ते जाणून घ्या.

Siddhi Hande

व्हॉट्सअ‍ॅपवर नवं फीचर

आता व्हॉट्सअ‍ॅपवर करता येणार स्क्रिन शेअर

स्क्रिन शेअरिंग फीचर कसं वापरायचं?

जगभरात कोट्यवधी लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. व्हॉट्सअ‍ॅपमुळे आपण जगभरातील कोणतीही माहिती काही सेकंदात शेअर करु शकतो. व्हॉट्सअ‍ॅपमुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. दरम्यान,आता व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी लवकरच एक नवीन फीचर लाँच केले आहे. आता व्हॉट्सअ‍ॅप लवकरच स्क्रिन शेअरिंग फिचर लाँच केलं आहे.

स्क्रिन शेअरिंग फिचरमुळे तुम्ही कोणत्याही व्यक्तीसोबत स्क्रिन शेअर करु शकतात. याचसोबत मीटींग अटेंड करणे अजूनच सोपे होणार आहे. तुम्हाला आता स्क्रिन शेअरिंगसाठी इतर कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करण्याची गरज नाही.

व्हॉट्सअ‍ॅपची कंपनी मेटा गेल्या अनेक दिवसांपासून हे फीचर लाँच करणार होते. त्यानंतर आता हे फीचर लाँच झाले आहे. तुम्ही मोबाईलवरुन किंवा लॅपटॉपवरुन व्हॉट्सअॅप स्क्रिन शेअरिंग फीचरद्वारे प्रेझेंटेशन करु शकतात.

व्हॉट्सअ‍ॅप स्क्रिन शेअरिंग फीचर कसं वापरायचं? (How to Use Whatsapp Screen Sharing Feature)

तुम्हाला आधी जर कोणाशी बोलायचे असेल तर व्हिडिओ कॉल करावा लागेल. आता तुम्ही व्हिडिओ कॉल केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ विभागावर तीन डॉट दिसती. त्यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला स्क्रिन शेअरचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही स्क्रिन शेअर करु शकतात. तुमचे काम पूर्ण झाल्यानंतर स्क्रिन शेअरिंग स्टॉप असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

स्क्रिन मिररिंगपासून सावध राहा

व्हॉट्सअॅपचे स्क्रिन शेअरिंग फीचर उपयुक्त आहे. तसेच ते सायबर क्राइमसाठीही वापरता येतात. यामुळे बँक किंवा सरकारी अधिकारी असल्याचे सांगून तुम्हाला व्हिडिओ कॉल करु शकतात. तुम्हाला स्क्रिन शेअर करायला सांगू शकतात. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती त्यांना मिळू शकते. यामुळे ते याचा वापर करुन तुमची फसवणूक करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात भाजपची पॉवर, मनसे नेत्यासह ४ बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ

Drunk Police Constable: मद्यधुंद पोलिसाची 6 गाड्यांना धडक, पोलिसांवर प्रकरण दडपण्याचा आरोप|VIDEO

Shahapur : दारूच्या नशेत विहीरीत उडी; एका व्यक्तीचा मृत्यू, पोलीस येताच गावकरी आक्रमक

Maharashtra Live News Update: सोलापुरात पत्नीचा पतीकडून खून; परिसरात खळबळ

Bonus Called In Marathi: दिवाळीला मिळणाऱ्या बोनसला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहितच नाही?

SCROLL FOR NEXT