
भारतात व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याने युजर्सना मोठ्या प्रमाणात अडचणी
लॉगिन, मेसेज पाठवणे, व्हॉट्सअॅप वेब स्कॅनिंग अशा समस्या समोर
सोशल मीडियावर युजर्सकडून तक्रारी वर्षाव
मेटा किंवा व्हॉट्सअॅपकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नाही
WhatsApp Down Problem : भारतामध्ये व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. डाउडिटेक्टर या संकेतस्थळानुसार, दुपारी एक वाजून १० मिनिटांपासून व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. याबाबत नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पडला आहे. अनेक युजर्सला सर्व्हर कनेक्शनचा त्रास जाणवतो. तर काही जणांना अॅप्स वापरताना इश्यू येतोय. अनेकांना व्हॉट्सअॅप वेब वापरतानाही अनेकांना समस्या येत आहेत. व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याच्या नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर तक्रारी केल्या आहेत. अनेकांकडून यावर मिम्सही तयार केलेत.
WhatsApp युजर्सककडून X प्लेटफॉर्मवर आपल्या तक्रारीचा पाढा वाचलाय. अनेकांनी एकमेकांना आपल्या समस्या सांगितल्या. युजर्सला होत असलेल्या समस्याबाबत अद्याप व्हॉट्सअॅप अथवा मेटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
देशभरातील शेकडो युजर्सला व्हॉट्सअॅप वापरण्यास अडचणी येत आहेत. अनेकांना लॉगइन करतानाही अडचणी येत आहेत. त्याशिवाय व्हॉट्सअॅप कनेक्ट होण्यास अडचणी येत आहेत. दीड ते दोन तास व्हॉट्सअॅप वापर करण्यास अडचण होत आहे. अॅप वापरताना अडचणी येत आहे. ग्रुपवर मेसेज जात नाहीत. व्हॉट्सअॅप वेब लॉगइन करताना फोनवरून स्कॅन करून लॉगइन होत नव्हतं.
मागील वर्षी जुलै महिन्यात WhatsApp जागतिक पातळीवर डाऊन झालं होतं. युजर्सना एकमेकांना मेसेज पाठवण्यात अडचणी आल्या होत्या. व्हॉट्सअॅप वेब आणि मोबाइल अॅप या दोन्ही ठिकाणाहून मेसेज पाठवण्यात युजर्सला अडचणी आल्या.
व्हॉट्सअॅप, फेसबुकसहित सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म आणि वेबसाईट या सर्व्हर डाऊन झाल्याने होतो. डोमेन नेम सिस्टम म्हणजे डीएनएस सर्व्हरमध्ये आऊटेजमुळे सेवेवर परिणाम होतो. या व्यतिरिक्त बॉर्डर गेटवे प्रोटोकॉलमध्ये अडथळा आणि बॅकबॉन राऊटर्सच्या कंफिग्रेशनमध्ये बदल झाल्यास सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म डाऊन होतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.