
नेपाळमध्ये २६ सोशल मीडिया अॅप्सवर बंदी
हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले
सोशल मीडियाविरोधात काठमांडूमध्ये तणावाचं वातावरण
आंदोलनात सैन्याने गोळीबार केल्याने काही आंदोलकांचा मृत्यू
नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात तरुणांनी आंदोलनाचा नारा दिला आहे. नेपाळमध्ये २६ सोशल मीडिया अॅप्सवरील बंदी विरोधात हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. या आक्रमक आंदोलक तरुणांनी संसदेत धावा केला. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने सैन्य दलाला गोळीबार करावा लागला. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नेपाळच्या काठमांडूमधील बानेश्वरमध्ये सैन्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
काठमांडूमध्ये तणावाचं वातावरण तापलं आहे. आंदोलकांनी अनेक ठिकाणी सुरक्षादलावर दगडफेक केली आहे. घटनेतील जखमी आंदोलकांना तातडीने सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आंदोलकांनी सरकारी पोस्टर देखील फाडले आहेत. सैन्याने आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या आहेत.
नेपाळने बंदी घातलेल्या सोशल मीडिया अॅप्समध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, व्हॉट्सअॅप आणि एक्स या अॅपचाही समावेश आहे. नेपाळमधील एकूण २६ अॅप्सवर बंदी घातल्याने तरुणांचा उद्रेक पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घातल्याने ऑनलाइन शिक्षण, व्यवसायात अडचणी येऊ लागल्या आहेत. २६ अॅप्सने नेपाळमध्ये रजिस्ट्रेशन न केल्याने कारवाई केल्याचं नेपाळ सरकारचे म्हणणं आहे.
नेपाळमधील सरकारी निधी, नोकऱ्यांवरूनही तरुणांकडून रोष व्यक्त केला जात आहे. आर्थिक मंदीमुळेही नेपाळमध्ये नोकऱ्या घटल्याचं बोललं जात आहे. यामुळेही मोठ्या प्रमाणात तरुण रस्त्यावर उतरला आहे. तरुण सोशल मीडियावर उतरून भ्रष्टाचार संपवण्याची मागणी केली आहे.
नेपाळचे पंतप्रधान पीएम केपी शर्मा यांनी चीनच्या धरतीवर नेपाळमध्ये सेन्सॉरशिप लागू केल्याचा तरुणांचा आरोप आहे. ओली सरकार हे चीनसारखं नेपाळमध्ये इंटरनेट, सोशल मीडियावर बंदी घातली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.