Solapur News : सोलापुरात आंदोलनाला गर्दी जमवण्यासाठी आमदाराकडून मटण पार्टी; मंत्री जयकुमार गोरे यांचा आरोप

Solapur politics : सोलापुरात आंदोलनाला गर्दी जमवण्यासाठी आमदाराकडून मटण पार्टी केल्याचा आरोप मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे.
Solapur
Solapur Politics Saam tv
Published On
Summary

माळशिरस तालुक्यातील २२ गावांसाठी नीरा देवघर धरणातून पाण्याची मागणी

आंदोलनाचे नेतृत्व आमदार जानकर आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलं

आंदोलनानंतर आमदार जानकर यांच्याकडून आंदोलकांसाठी मटण पार्टी आयोजित

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मटण पार्टीवर जोरदार टीका

सोलापूरच्या माळशिरसचे शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. रास्तारोको आंदोलनाला गर्दी जमवण्यासाठी चक्क आंदोलकांना मटण पार्टी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आमदार जानकर यांची ही मटण पार्टी आता चर्चेत आली आहे. आमदारांच्या मटण पार्टीवर विरोधकांनी टीका केली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही आमदार जानकर यांच्या या मटण पार्टीवर जोरदार टीका केली.

आमदार जानकर यांनी मटण पार्टीमध्ये जाता जाता आंदोलन केलं. पाणी आणि आंदोलनाबद्दल त्यांना प्रेम नाही हे यातून दिसून येते. आमदार जानकर यांची ही स्टंटबाजी असल्याची टीका पालकमंत्री गोरे यांनी केली.

Solapur
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री नाराज असल्यावर दरेगावी जातात? विरोधकांच्या आरोपांना एकनाथ शिंदेंचं थेट उत्तर, म्हणाले...

माळशिरस तालुक्यातील 22 गावांना नीरा देवघर धरणातून शेतीसाठी पाणी मिळावे या मागणीसाठी आज रविवारी आमदार उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस - म्हसवड महामार्गावर रास्तारोको आंदोलन केलं. आंदोलनानंतर उपस्थित सर्व आलेल्या लोकांना मटण पार्टी देण्यात आली. यामुळे आमदाराची मटण पार्टी चर्चेत आली आहे.

नीरा देवघरच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन

नीरा देवघर धरणाचे माळशिरस तालुक्यातील दुष्काळी २२ गावांना शेतीसाठी पाणी मिळावे या मागणीसाठी आज माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केलं. माळशिरस तालुक्यातील गारवाड येथे म्हसवड-माळशिरस मार्गावर शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केलं. सुमारे दोन तास शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

Solapur
Dhananjay Munde : पोलिसांना आडनाव लावता येत नसेल तर....; आमदार धनंजय मुंडे यांच्याकडून समाजातील समतेवर प्रश्नचिन्ह

नीरा देवघर धरणातून दुष्काळी भागातील २२ गावांना पाणी मिळावे या मागणीसाठी येथील शेतकऱ्यांच्या मागील ३० वर्षांपासून संघर्ष सूरू आहे. या भागातील सुमारे 50 हजार शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत. या भागातील खासदार आणि आमदारविरोधी पक्षाचे असल्याने सरकार दुजाभाव करत आहे. सरकारने या भागातील कॅनलची कामे तातडीने सुरू करावी अन्यथा मंत्रालयावर मोर्चा काढू इशारा आमदार उत्तमराव जानकर यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com