Dhananjay Munde : पोलिसांना आडनाव लावता येत नसेल तर....; आमदार धनंजय मुंडे यांच्याकडून समाजातील समतेवर प्रश्नचिन्ह

Dhananjay Munde News : आमदार धनंजय मुंडे यांच्याकडून समाजातील समतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच देशातील महापुरुषांवरही मुंडे यांनी भाष्य केलं.
Dhananjay Munde News
Dhananjay Munde Saam tv
Published On
Summary

अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात धनंजय मुंडेंकडून समाजिक समतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित .

पोलिसांना स्वतःचं आडनाव लावता येत नसेल, तर समता उरली आहे का?” असा त्यांनी प्रश्न केलाय

महापुरुषांच्या जयंती सर्वांनी साजरी करावी, त्या एकाच समाजापुरत्या न ठेवाव्यात, असं ते म्हणाले.

संविधान, शिक्षण आणि लोकशाही ही सर्वसमावेशक तत्त्वं असल्याचे त्यांनी ठासून सांगितलं

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड: मला सांगायला लाज वाटते. बीड जिल्ह्यात पोलिसांना आपलं आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का? मधल्या काळात आपल्या जिल्ह्यातच नाही, तर अनेक ठिकाणी सामाजिक समता उरली नाही. समाजातील लोकांनी पुन्हा पुढे येऊन मागं जे घडलं ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आली आहे, असं माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

बीड येथे आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त कार्यक्रमात धनजंय मुंडे यांची हजेरी लावली. बीडमधील सत्यशोधक समाज भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना सामजित समतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. धनजंय मुंडे म्हणाले की,समाजात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या लोकांचा आपण पुरस्कार वितरण सोहळा ठेवला आहे. बीड जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावात प्रत्येकाला अनुभव आलाय. तो अनुभवलाही आहे.

Dhananjay Munde News
Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

'आज आपण प्रत्येकांनी आपले आपले महामानव बांधून घेतल आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती फक्त मराठा समाजानं साजरी करायची का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फक्त मागास प्रवर्गातील लोकांनी साजरा करायचा का? महात्मा फुले यांची जयंती फक्त माळी समाजाने साजरी करायची का? शिक्षणाची चळवळ महात्मा फुले यांनी सुरू केली. त्यामुळे माळी समाजातील लोकांनी शिक्षण घ्यायचे का? भगवान बाबांची जयंती फक्त वंजारी समाजाने साजरी करायची का? असे प्रश्न मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित केले.

'मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य फक्त मराठा समाजासाठी उभे केले नव्हते. तर ते अठरा पगड समजासाठी उभे केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाला दिले, हे संविधान फक्त मागास प्रवर्गातील लोकांसाठी निर्माण नाही केले. साहित्यातून उपासी माणसांची व्यथा खऱ्या अर्थाने कुणी मांडली लिहिली, तो माणूस अण्णाभाऊ साठे यांनी मांडली, असेही ते म्हणाले.

Dhananjay Munde News
Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

'महात्मा फुले यांनी देश स्वातंत्र्य होण्याआधी शिक्षणाची चळवळ निर्माण केली. ती फक्त माळी समाजासाठी नाही केली. भगवान बाबांनी अध्यात्मतून आणि शिक्षणातून सांगड घातली, ती फक्त वंजारी समाजासाठी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासह सर्वच महापुरुषांचे कार्य आणि शिकवण ही सर्वसमावेशक राहिलेले आहेत. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन सामाजिक कार्य करताना आपण महापुरुषांना जातीय बंधनात अडकवत न ठेवता सर्वव्यापी कार्य करायला हवे, असे आवाहन देखील धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

Dhananjay Munde News
Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

'आता शासनाकडून प्रश्न सोडवून घेण्याची जबाबदारी आणि जयंती साजरी करण्याची जबाबदारी माझी आहे, असे माजी मंत्री धनजंय मुंडे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com