EPFO News : PF खातेधारकांसाठी खुशखबर! एटीएममधून मिनिटांत काढता येणार पैसे, 'या' तारखेपासून सुरु होणार सेवा, जाणून घ्या

EPFO News : ईपीएफओ सदस्यांसाठी मोठी बातमी! जानेवारी २०२६ पासून एटीएम व UPI द्वारे थेट पीएफ पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होणार. विशेष कार्डच्या मदतीने काही मिनिटांत तुम्हाला तुमचे हक्काचे पैसे मिळणार आहेत.
EPFO News : PF खातेधारकांसाठी खुशखबर! एटीएममधून मिनिटांत काढता येणार पैसे, 'या' तारखेपासून सुरु होणार सेवा, जाणून घ्या
EPFO NewsSaam Tv
Published On
Summary
  • जानेवारी २०२६ पासून एटीएम व UPI द्वारे थेट पीएफ पैसे काढणे सोपे होणार आहे.

  • या परिवर्तनामुळे देशभरातील ७ कोटी सदस्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

  • EPFO विशेष कार्डद्वारे एटीएममधून मिनिटांत रक्कम उपलब्ध होणार आहे.

  • CBT बैठकीनंतर या योजनेला अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

EPFO धारक कोट्यवधी सदस्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासा देणारी बातमी आहे. आतापर्यंत पीएफचे पैसे काढण्यासाठी लांब लचक प्रक्रियेला सामोरे जावे लागत होते. परंतु आता ही प्रक्रिया पूर्णपणे बदलणार आहे. ईपीएफओ लवकरच एटीएममधून पीएफचे पैसे काढण्याची सुविधा सुरू करणार आहे. यामुळे भविष्यात तुम्हाला तुमच्या पीएफचे पैसे काही मिनिटांत थेट एटीएममधून काढता येणार आहेत.

ईपीएफओचे देशभरात सुमारे ७ कोटींहून अधिक सदस्य आहेत. या नवीन सुविधेमुळे या सर्व खातेधारकांना मोठा फायदा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईपीएफओ जानेवारी २०२६ पासून एटीएममधून पीएफचे पैसे काढण्याची ही सुविधा सुरु होणार आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत पैशांसाठी खूप दिवस वाट पाहावी लागणार नाही. काही मिनिटांतच तुमच्या हातात पैसे मिळतील.

EPFO News : PF खातेधारकांसाठी खुशखबर! एटीएममधून मिनिटांत काढता येणार पैसे, 'या' तारखेपासून सुरु होणार सेवा, जाणून घ्या
Pune Viral Video : भर रस्त्यात तरूणीला लाथा बुक्क्यांनी मारलं, पुण्यात नेमकं चाललंय काय ? व्हिडिओ पाहून राग अनावर येईल

एटीएममधून पीएफचे पैसे काढण्याची तांत्रिक तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, या सुविधेच्या पद्धती आणि पैसे काढण्याची मर्यादा या सगळ्या गोष्टींवर चर्चा होणे बाकी आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या सीबीटीच्या बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. या बैठकीनंतर या नवीन सुविधेला अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

EPFO News : PF खातेधारकांसाठी खुशखबर! एटीएममधून मिनिटांत काढता येणार पैसे, 'या' तारखेपासून सुरु होणार सेवा, जाणून घ्या
EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! PF काढण्याच्या नियमात करणार बदल; वाचा सविस्तर

ईपीएफओची ही नवीन सुविधा सुरू झाल्यानंतर तुम्ही तुमच्या सामान्य डेबिट कार्डमधून ज्याप्रमाणे पैसे काढता त्याचप्रमाणे एटीएममधून पीएफचे पैसे काढू शकाल. यासाठी तुम्हाला ईपीएफओकडून एक नवीन विशेष कार्ड दिले जाणार आहे. या कार्डच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत तुमची पीएफची रक्कम मिळवू शकणार आहेत. याशिवाय तुम्हाला UPI द्वारे देखील पीएफचे पैसे काढता येणार आहे. यासाठी तुम्हाला तुम्हाला तुमचे पीएफ खाते UPI शी लिंक करावे लागेल.

EPFO News : PF खातेधारकांसाठी खुशखबर! एटीएममधून मिनिटांत काढता येणार पैसे, 'या' तारखेपासून सुरु होणार सेवा, जाणून घ्या
PF Withdrawal: आता काही मिनिटांत काढता येणार PF खात्यातून १ लाख रुपये; सोपी आहे प्रोसेस; वाचा सविस्तर

सध्याच्या पीएफ काढण्याच्या नियमानुसार, तुमची नोकरी काही कारणास्तव गेली, तर तुम्ही एका महिन्यानंतर तुमच्या पीएफ खात्यातून ७५ टक्के पैसे काढू शकता. उर्वरित २५ टक्के रक्कम नोकरी सोडल्यानंतर दोन महिन्यांनी काढता येते. पीएफ क्लेमची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही ईपीएफओ डॅशबोर्डवर जाऊन 'ट्रॅक क्लेम स्टेटस' वर क्लिक करू शकता. तुमचा दावा निकाली निघालेला दिसत असेल, तर तुमच्या पीएफचे पैसे मंजूर झाले आहेत आणि ते तुम्ही ईपीएफओ पासबुकमध्ये देखील तपासू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com