Pune Viral Video : भर रस्त्यात तरूणीला लाथा बुक्क्यांनी मारलं, पुण्यात नेमकं चाललंय काय ? व्हिडिओ पाहून राग अनावर येईल

Pune Shocking News : पुण्यात रस्त्यावर तरुणाने तरुणीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेने समाजात संतापाची लाट उसळली आहे.
Pune Viral Video : भर रस्त्यात तरूणीला लाथा बुक्क्यांनी मारलं, पुण्यात नेमकं चाललंय काय ? व्हिडिओ पाहून राग अनावर येईल
Pune NewsSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यात नवरात्रीच्या काळात तरुणाने तरुणीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

  • तरुणाने तरुणीला लाथा बुक्क्यांनी मारलं.

  • पोलिसांकडे अद्याप तक्रार दाखल नाही.

  • घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र देवीचा जागर केला जातो आहे. तर अनेक ठिकाणी कर्तृत्वान महिलांचा सत्कार आणि सन्मान सोहळे सुरू आहेत. मात्र असं असताना पुण्यात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. एका दानावाप्रमाणे एक तरुण एका तरुणीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करतानाचा व्हिडिओ आता समोर आला आहे. एका किरकोळ वादातून एका तरुणाने तरुणीला कानशिलात लावत लाथा मारल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळे विद्येचं माहेर घर असलेल्या पुण्यात नेमकं चाललंय काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पुणे सातारा रस्त्यावरील के के मार्केट ते चव्हाण नगर मार्गा दरम्यान घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओमध्ये तरुण तरुणीमध्ये बाचाबाची झाल्याचे दिसून येत आहे. तर संतापलेल्या तरुणाने तरुणीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. धक्कादायक म्हणजे आजूबाजूला झालेल्या बघ्यांच्या गर्दीने या तरुणाला न थांबवता फक्त बघण्याची भूमिका घेतली. हे अत्यंत खेदजनक आहे.

आता ही मारहाण कुठल्या कारणामुळे झाली, मारहाण करणारा तरुण संबंधित तरुणीचा कोण आहे याबद्दल कुठली ही माहिती अद्याप मिळालेली नाही. शिवाय रात्री उशिरा पर्यंत कुठली ही तक्रार प्राप्त न झाल्याची माहिती सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी दिली. असं असलं तरी सुद्धा या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे.

Pune Viral Video : भर रस्त्यात तरूणीला लाथा बुक्क्यांनी मारलं, पुण्यात नेमकं चाललंय काय ? व्हिडिओ पाहून राग अनावर येईल
Maharashtra Farmers : हातातोंडाशी आलेला घास पाण्यात, शेतातील कपाशीचं पीक वाया; शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय

दरम्यान सर्वत्र नवरात्रीचा उत्सव सुरु आहे. आज देवीची दहावी माळ आहे. उद्या दसरा असल्याकारणाने बाजारपेठा आज सकाळपासून फुलल्या आहेत. मात्र ज्या देवीची पूजा केली जाते त्याच देवीचं रूप असलेल्या स्त्रिला मात्र खालच्या दर्जाचं स्थान अजूनही समाजात दिल जात आहे. हे या घटनेतून दिसून आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com