IAS Officer Animesh Pradhan Saam Tv
बिझनेस

Success Story: आई कॅन्सरने गेली, पोरानं तिच्यासाठी UPSC क्लिअर केली, IAS अनिमेष प्रधानची सक्सेस स्टोरी वाचून डोळ्यात पाणी येईल!

Siddhi Hande

प्रत्येकाचे आपल्या आईवर खूप प्रेम असते. आपली आई आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ असते. आईसाठी आपण काहीही करायला तयार असतो. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण खूप मेहनत करतात. असंच आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनिमेश प्रधान यांनी यूपीएससी परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात UPSC CSE परीक्षा क्रॅक केली. (IAS Officer Animesh Pradhan Success Story)

अनिमेष प्रधान यांनी २०२३ मध्ये यूपीएससी परिक्षेत २ रँक मिळवला. २४ व्या वर्षी अनिमेष यांनी मोठे यश मिळवले. अनिमेष यांनी आपल्या आईसाठी यूपीएससी परीक्षा दिली आणि पास झाले. ज्या आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनिमेष यांनी परीक्षा दिली. त्याच परिक्षेत मिळालेलं यश पाहण्यासाठी आईच नव्हती. अनिमेष यांच्या आईचं कर्करोगाने निधन झाले. जेव्हा अनिमेष आपल्या यूपीएससी इंटरव्ह्यूची तयारी करत होते, तेव्हाच त्यांच्या आईने जगाचा निरोप घेतला.

अनिमेष हे मूळचे ओडिशा येथील तालचेर येथील रहिवासी होते. त्यांनी एनआयटी राउरकेला येथून कॉम्प्युटर सायन्समधून बीटेक पदवी प्राप्क केली. त्यानंतर ते इंडियन ऑइल रिफायनरी दिल्ली येथे कार्यरत होते. अनिमेष हे ११ वीत असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते.

अनिमेष यांची आई कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्याचवेळी त्यांनी यूपीएससी परीक्षा पास करायची होती. त्यांना खूप गर्व वाटेल, असं काहीतरी करायचं होते, असं त्यांनी सांगितलं. परंतु त्यांचे हे यश पाहण्यासाठी आईच नव्हती. (IAS Officer Success Story)

अनिमेष यांनी २०२२ मध्ये यूपीएससी (UPSC)परिक्षेची तयारी सुरु केली. ते रोज ६ ते ७ तास अभ्यास करायचे. त्यांनी प्रत्येक खडतर परिस्थितीचा सामना करत आईचे स्वप्न पूर्ण केले. त्यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आयुष्यात खूप मोठे यश मिळवले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT