Success Story Krishna yadav
Success Story Krishna yadavsaam tv

Success Story: ५०० रूपयांपासून केली बिझनेसला सुरुवात; आज आहेत ५ कोटींच्या मालकीण, पाहा कृष्णा यांची यशोगाथा

Success Story: हातात केवळ ५०० रूपये असताना कृष्णा यांनी ५ कोटींच्या टर्नओव्हरची कंपनी सुरु केली आहे. कशी आहे त्यांच्या बिझनेसची यशोगाथा पाहूयात.
Published on

म्हणतात ना, अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर व्यक्ती कोणतीही गोष्ट साध्य करू शकते. भले ती गोष्ट कितीही असेल, मेहनत केली की तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. अशीच काहीशी गोष्ट आहे दिल्लीच्या नजफगढमध्ये राहणाऱ्या कृष्णा यादव यांची. हातात केवळ ५०० रूपये असताना कृष्णा यांनी ५ कोटींच्या टर्नओव्हरची कंपनी सुरु केली आहे. कृष्णा लोणचं बनवण्याचा बिझनेस करतात. त्यांनी एका छोट्या रूमपासून याला सुरुवात केली होती. कशी आहे त्यांच्या बिझनेसची यशोगाथा पाहूयात.

कृष्णा यांच्या कंपनीचं नाव कृष्णा पिकल्स असं आहे. २१ नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली होती. आता त्यांची ही लोणच्याची कंपनी तब्बल ५ कोटींचं टर्नओव्हर देते. मुख्य म्हणजे या माध्यमातून शेकडो महिलांना रोजगार मिळाला असून त्या या ठिकाणी काम करतात.

Success Story Krishna yadav
Success Story: केवळ २ हजारांत सुरुवात, आता महिन्याला ६ लाखांची कमाई; ठाण्याच्या 'लाडक्या बहिणी'ची यशोगाथा

बिझनेससाठी विकावं लागलं होतं घर

कृष्णा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील दौलतपूरमधील एका छोट्या गावात झाला आहे. त्यांनी शालेय शिक्षणाची एकंही पायरी चढली नव्हती. लग्नानंतर त्या पतीसोबत बुलंदशहरला आल्या. यावेळी पतीची नोकरी गेल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. या काळात कृष्णा आणि त्यांच्या पतीला दोन्ही घरं विकावी लागली. यावेळी या दोघांनीही दररोज दोन वेळेच्या जेवणासाठी झगडावं लागलं.

अवघ्या ५०० रूपयांनी केली होती बिझनेसला सुरुवात

परिस्थिती बिकट झाल्यानंतरही कृष्णा मागे हटल्या नाहीत. त्या ५०० रुपये घेऊन पतीसोबत दिल्लीला आल्या. दिल्लीत बरीच शोधाशोध करूनही त्यांना फारसं चांगलं काम मिळालं नाही. यावेळी त्यांनी पतीसोबत पीक घेऊन शेती करण्यास सुरुवात केली. मात्र याचाही त्यांना फायदा झाला नाही. अखेरीस 2001 मध्ये उजवा इथल्या कृषी विज्ञान केंद्रात तीन महिने फूड प्रोसेसिंग टेक्नोलॉजीचं प्रशिक्षण घेतलं. यानंतर त्यांनी आपल्या शेतात 3000 रुपये खर्चून पिकवलेल्या क्रॅनबेरी आणि मिरचीच्या लोणच्यापासून 5250 रुपये नफा कमावला.

Success Story Krishna yadav
Success Story: 8 हजारांच्या कर्जात सुरू केला बिझनेस, आज आहेत 800 कोटींच्या मालकीण, कोण आहेत मीना बिंद्रा?

यानंतर कृष्णा यांनी मागे वळून पाहिलं नाही. कृष्णाने अवघ्या काही वर्षांत स्वतःची कंपनी स्थापन केली. ही कंपनी कृष्णा पिकल्स म्हणून ओळखली जाते. आता त्याच्याकडे 4 लहान युनिट्स असून एकूण 152 उत्पादनं तयार केली जातात. यामध्ये दिल्लीत दोन आणि हरियाणात दोन युनिट्स आहेत. या ठिकाणी दररोज 10 ते 20 क्विंटल लोणची बनवली जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com