Success story: 2 शिलाई मशीनने सुरुवात करणारी महिला आज आहे नीता अंबानींची फॅशन डिझायनर, कोट्यवधींची मालकीण

Success story: कोणत्याही बिझनेससाठी आर्थिक बॅकअप असणं गरजेचं आहे. कठीण काळात देखील हार न मानता पुन्हा जोमाने उभं राहणं गरजेचं असतं. अशीच काहीशी कथा आहे फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांची.
Nita Ambani fashion designer
Nita Ambani fashion designersaam tv
Published On

नोकरी करण्यापेक्षा एखादा बिझनेस करावा असा विचार आपल्या प्रत्येकाच्या मनात एकातरी येऊन गेला असेल. मात्र प्रश्न अडतो तो केवळ पैशांवर येऊन. कोणत्याही बिझनेससाठी आर्थिक बॅकअप असणं गरजेचं आहे. मुळात बिझनेस कोणताही असो कठीण काळ हा प्रत्येकाच्या जीवनात येतो. पण त्या कठीण काळात देखील हार न मानता पुन्हा जोमाने उभं राहणं गरजेचं असतं. अशीच काहीशी कथा आहे फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांची.

आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणींमधून त्यांनी मार्ग काढला आणि आज त्या देशातील सर्वात श्रीमंत डिझायनर्सपैकी एक आहेत. याशिवाय उद्योजिका नीता अंबानीसह अनेक अभिनेत्रीच्या त्या फॅशन डिझायनर आहेत. एकेकाळी दोन शिलाई मशिनपासून सुरुवात करणाऱ्या अनिता डोंगराने स्वतःच्या बळावर १४०० कोटी रुपयांचा फॅशन ब्रँड तयार केलाय. जाणून घेऊया त्यांची यशोगाथा.

Nita Ambani fashion designer
Success Story: केवळ २ हजारांत सुरुवात, आता महिन्याला ६ लाखांची कमाई; ठाण्याच्या 'लाडक्या बहिणी'ची यशोगाथा

कोण आहेत अनिता डोंगरे?

अनिता डोंगरा या भारतातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. त्यांचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आहे, ज्याच्या ब्रँड ॲम्बेसेडरमध्ये बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ ते हॉलीवूड स्टार बेयॉन्से यांसारखे सेलेब्रिटी आहेत. हाउस ऑफ अनिता डोंगरे या नावाने त्यांचं ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्स आहेत. या फॅशन ब्रँडचे वॅल्यूएशन 1400 कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे. एक वेळ अशी होती ती कधीकधी त्यांचे कपडे रिजेक्ट केले, तर कोणत्याही दुकानाला त्यांनी डिझाइन केलेले कपडे स्टॉक करायचं नव्हते, मात्र आज त्या देशातील टॉप डिझायनर्समध्ये आहेत.

२ शिलाई मशीन्सने केले होती सुरुवात

अनिता यांना फॅशनची आवड त्याच्या आईकडून मिळालीये. त्ंयाची आई एका कपड्याच्या दुकानात कपडे शिवायची. वयाच्या 19 व्या वर्षी अनिता यांनी ठरवलं की, आपल्याला फॅशन डिझायनर व्हायचंय. सुरुवातीला त्यांच्या या करियरसाठी कुटुंबात खूप विरोध झाला. मात्र घरच्यांचा विरोध असतानाही त्यांनी हे पाऊल उचललं. त्यावेळी केवळ दोन शिलाई मशिन घेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली.

कामाला सुरुवात केल्यानंतर त्यांना अनेक अडचणी आणि आव्हानं आली. इतकंच नाही तर त्यांना मित्र मैत्रिणींकडूनही चिडवण्यात आलं. अनिता या त्यांच्या ५० वर्षांच्या कुटुंबातील पहिल्या महिला आहेत ज्यांनी कमाई केली. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी त्यांनी कमावण्यास सुरुवात केली आणि आर्थिकदृष्ट्या त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या.

300 चौरस फूट जागेतून अनिता यांनी आपला ब्रँड सुरू केला. भारतीय परंपरेसोबत त्यांनी पाश्चात्य फॅशनचं मिश्रण केलं. परंतु अडचणी काही संपल्या नव्हत्या कारण कपडे तयार झाले होते आणि आता ते विकायचे होते. शॉपिंग मॉल्सपासून फॅशन शॉप्सपर्यंत त्यांच्या डिझाईन्स नाकारल्या गेल्या.

Nita Ambani fashion designer
Success Story: 8 हजारांच्या कर्जात सुरू केला बिझनेस, आज आहेत 800 कोटींच्या मालकीण, कोण आहेत मीना बिंद्रा?

जेव्हा कपडे रिजेक्ट झाले किंवा विकले गेले नाहीत तेव्हा त्यांनी स्वतःचा ब्रँड सुरू करण्याचा निर्णय घेतला. 1995 मध्ये त्यांनी पहिला ब्रँड उघडला. एका स्टोअरने सुरुवात केली आणि आज त्यांची देशभरात 270 हून अधिक फॅशन स्टोअर्स आहेत. सध्याच्या घडीला फर्मची किंमत 1400 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. फोर्ब्सनुसार, अनिता ही भारतातील सर्वात श्रीमंत महिला फॅशन डिझायनर आहे. त्यांची एकूण संपत्ती ८४ कोटी रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com