Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी लेकीने क्रॅक केली UPSC; बस कंडक्टरची मुलगी झाली IPS

Success Story of IPS Shalini Agnihotri: आयपीएस शालिनी अग्निहोत्री यांनी खूप कमी वयात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय त्यांनी हे यश मिळवलं आहे.

Siddhi Hande

आयुष्यात काही गोष्टी आपल्याला खूप काही शिकवतात. एकेकाळी झालेल्या अपमानामुळे आपलं पूर्ण आयुष्यच बदलतं. अपमानाचे उत्तर हे नेहमी आपल्या कामातून द्यायचे असते. असंच काहीसं शालिनी अग्निहोत्री यांनी केलं. आईच्या अपमानाचे उत्तर त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध करुन दिले. (IPS Shalini Agnihotri Success Story)

शालिनी अग्निहोत्री या आयपीएस पदावर कार्यरत आहेत. त्यांचा प्रवास हा खूप खडतर आणि प्रेरणादायी आहे. शालिनी या मूळच्या हिमाचल प्रदेशच्या रहिवासी. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांची मेहनत आणि दृढतामुळे त्यांना हे यश मिळाले आहे.

शालिनी यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट (Shalini Agnihotri Life Turning Point)

शालिनी यांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला. त्याच क्षणी त्यांनी काहीतरी मोठे करुन दाखवायचा संकल्प केला. खूप वर्षांआधी जेव्हा त्या फिरायला गेल्या होत्या. तेव्हा एका व्यक्तीने त्यांच्या आईचा अपमान केला होता. त्यावेळी त्या काहीच करु शकल्या नाहीत. आपण आईसाठी आपण काहीही करु शकलो नाही त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटले.

शालिनी या पहिल्यापासूनच हुशार होत्या. त्यांनी धर्मशाला येथे आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. १०वीत असताना त्यांना ९२ टक्के मिळाले होते. तर १२वीत ७७ टक्के मिळाले होते. त्यांनी हिमाचल प्रदेश युनिव्हर्सिटीमधून अॅग्रीकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केले. त्यांना पहिल्यापासूनच सिवि सर्व्हिसमध्ये काम करायचे होते.

शालिनी यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी सेल्फ स्टडी आणि ऑनलाइन अभ्यास केला. त्यांनी २०११ मध्ये यूपीएससी परीक्षेत २८५ रँक मिळवली. त्यानंतर त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

शालिनी यांचे वडील बसमध्ये कंडक्टर होते. त्यांनी आपली परिस्थिती लक्षात ठेवून ती बदलण्याचा निर्णय घेतला. आईवडिलांसाठी त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आक्रमक आंदोलन; ग्रेस मार्क आणि परीक्षा पॅटर्नवरून गोंधळ

Fact Check: 500 रुपयाच्या नोटा बंद होणार? एटीएममध्ये नोटा न टाकण्याचे बँकांना आदेश? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ravindra Jadeja : एकटा नडला, इंग्लंडला घाम फोडला; भारताचा पराभव झाला, पण रवींद्र जडेजा लक्षात राहीला

IND vs ENG 3rd Test: लय भारी! शानदार रवींद्र जडेजा; बनवला ७२ वर्षांत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम

Maharashtra Politics: शिंदे की ठाकरे, धनुष्यबाण कुणाचा? पालिका निवडणुकीत कुणाचं टेन्शन वाढणार?

SCROLL FOR NEXT