
IPL 2025 मधला ६१ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना होणार आहे. धर्मशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (HPCA) हा सामना खेळला जाणार होता. आता हा सामना धर्मशालाच्या ऐवजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल अशी माहिती समोर आली आहे. सामन्याचे ठिकाण का बदलण्यात आले? चला जाणून घेऊयात...
पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याचे प्रत्त्युतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिले. भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट केले. यानंतर पाकिस्तानने कुरघोडी करायला सुरुवात केली. सीमेलगतच्या भागात पाकिस्तानने गोळीबार केला. या गोळीबाराचे प्रत्त्युतर भारतानेही दिले. याच पार्श्वभूमीवर देशभरात अलर्ट जारी करण्यात आला.
भारतातील उत्तर आणि पश्चिम भागातील १८ विमानतळे बंद करण्यात आली आहेत. श्रीनगर, लेह, जम्मू, अमृतसर, पठानकोट, चंडीगड, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धर्मशाला आणि जामनगर या विमानतळांवरील सेवा १० मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धर्मशाला विमानतळ तात्पुरत्या तत्वावर बंद केल्याने तेथील एचपीसीए स्टेडियमवर खेळण्यासाठी जाणाऱ्या आयपीएल संघांच्या प्रवास वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.
११ मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना एचपीसीए स्टेडियमवर खेळवला जाणार होता. पण हा सामना आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शिफ्ट करण्यात आला आहे. विमानसेवा बंद असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. गुजरात क्रिकेट संघाचे सचिव अनिल पटेल यांनी ११ मे रोजी दुपारी ३.३० वाजता पंजाब विरुद्ध मुंबई सामना होईल, अशी माहिती दिली. मुंबईचा संघ आज अहमदाबादला पोहोचेल, तर पंजाब किंग्सच्या प्रवास वेळापत्रकाबद्दल लवकरच समजेल असे अनिल पटेल म्हणाले.
पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ सध्या धर्मशालामध्येच असल्याने आजचा सामना (८ मे) एचपीसीए स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर पंजाबचा संघ अहमदाबादसाठी निघेल. विमानसेवांचा अंदाज घेऊन धर्मशालामधील संघ बाहेर पडतील असे म्हटले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.